भाजप हे लोकशाहीला लागलेले ग्रहण : प्रा. जोगेंद्र कवाडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

औरंगाबाद : "ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. यात एमआयएम, सीपीएम, डावे, नक्षलवादी, माओवादी घेतले, मात्र, आंबेडकरी विचाराने काम करणाऱ्या रिपब्लिकन चळवळीला टाळले.याच कारणामुळे या वंचित बहुजन आघाडीपासून आम्हाला वंचित ठेवल्याचे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी बुधवारी (ता.26) पत्रकार परिषदेत सांगितले. 

पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सुशिक्षित्‌ बेरोजगार महामेळावा, रमाई घरकुल साहित्य विरतण व कार्यकर्ता प्रवेश सोहळा पक्षाची ध्येय धोरणाच्या कार्यक्रमासाठी प्रा. कवाडे औरंगाबादेत आले असता, सुभेदारी विश्रामगृहात कवाडे पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले,  ''संविधाना विरोधात काम करणाऱ्या आर.एस.एस, भारतीय जनता पक्षांना सत्तेपासून दूर ठेवणे हेच आमचे प्रमुख धोरण आहे. देशात पाच राज्यातील निवडणुकांमुळे वातावरण बदलले आहे. यामुळे देशात आणि राज्यातही सत्ता बदल होण्याची भीती भाजपला आहे. यामुळे ते आता शिवसेनेसोबत घेण्यास इच्छुक आहे. भाजप हे लोकशाहीला लागलेले ग्रहण आहे. यामुळे भाजपला सत्तेतून पाय उतार करण्याच्या दृष्टीने कामे करण्यात येणार आहेत. काँग्रेससोबत आघाडीची आमची बोलणी सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाने कॉंग्रेसकडे सहा जागांचा प्रस्ताव दिला आहे. यापैकी चार जागा विदर्भ तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येकी एका जागेसाठी प्रयत्न सुरू आहेत.''

ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडी सोबत आपली काही चर्चा झाली का? या प्रश्‍नावर "वंचित आघाडीने आम्हाला वंचित ठेवले'असे म्हणत त्यांना एमआयएम, सीपीएम, डावे, नक्षलवादी, माओवादी चालतात पण कवाडे, आठवले, खोब्रागडेसह रिपब्लिकन पक्ष मात्र चालत नसल्याची टीका केली.

Web Title: BJP is disgrace to Indian democracy, says Jogendra Kawade