भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

वारंगा फाटा (ता. कळमनुरी) - भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रामराव भीमराव पतंगे ऊर्फ आबा (वय 64) यांचा मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास पुणे-मुंबई मार्गावर लोणावळ्याजवळ अपघाती मृत्यू झाला.

काही दिवसांपूर्वी सकाळी फिरायला जात असताना पतंगे यांना वाहनाने धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांना मुंबई येथील बॉंबे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी रात्री रुग्णवाहिकेद्वारे मुंबई येथे नेले जात होते. पुणे-मुंबई मार्गावरील लोणावळ्याजवळ आज भरधाव ट्रकने रुग्णवाहिकेला धडक दिली. यात पतंगे यांचा मृत्यू झाला.

Web Title: BJP Ex District President Death in Accident Ramrao Patange