विरोधकांवर टीकास्त्राने भाजपचे उपोषण - रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

अधिवेशन सुरू असताना २३ दिवस काँग्रेस व त्यांच्या अन्य मित्र पक्षांनी मुद्दाम गोंधळ घातल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. दानवे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेत गुलमंडीवर उपोषण झाले.

औरंगाबाद - अर्थसंकल्पी अधिवेशनात काँग्रेससह विरोधकांनी संसदेचे कामकाज चालू न दिल्याच्या निषेधार्थ भाजपतर्फे मराठवाड्यात गुरुवारी (ता. १२) लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्या त्या जिल्ह्यांतील खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते या उपोषणात सहभागी झाले.

लोकप्रतिनिधींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. दरम्यान, काँग्रेसने नुकत्याच केलेल्या उपोषणाला भाजपने तशाच कृतीतून प्रत्युत्तर दिले.

काँग्रेसकडूनच तेढ
जालना - आमदार संतोष दानवे यांच्या नेतृत्वाखाली येथील मामा चौकात लाक्षणिक उपोषण झाले. पदाधिकारी भास्कर दानवे, जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, सिद्धिविनायक मुळे आदी सहभागी झाले. देशात काँग्रेसकडून जाती- जातींत तेढ निर्माण केली जात असल्याची टीका आमदार दानवे यांनी केली.

‘उपोषण ही स्टंटबाजी नव्हे’
बीड - अधिवेशनकाळात विरोधकांनी संसदेचे कामकाज बंद पाडून देशाचे नुकसान केले. महिनाभर काम न झाल्याने भाजप खासदारांनी आपले एक महिन्याचे वेतन आणि भत्ते शासनाला परत केले. उपोषण ही स्टंटबाजी नव्हे तर विरोधकांचा निषेध आहे. स्टंटबाजी करायची असती तर सभा, फेऱ्या काढून शक्तिप्रदर्शन केले असते, अशी भूमिका खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी येथे व्यक्त केली. येथील उपोषणात खासदार मुंडे यांच्यासह भाजप आमदार संगीता ठोंबरे, लक्ष्मण पवार, भीमराव धोंडे, आर. टी. देशमुख आदींनी सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत मत नोंदविले.

विरोधकांचा निषेध
लातूर - खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली येथील गांधी चौकात उपोषण झाले. या वेळी विरोधकांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. 

उस्मानाबादेत घोषणाबाजी
उस्मानाबाद - भाजपचे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेस विरोधी घोषणा देत येथे उपोषणाला सुरवात झाली. काँग्रेसला लोकशाही मान्य नसून घराणेशाहीद्वारे खुर्ची व सत्तेचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले.

Web Title: BJP fasting ravsaheb danve politics