भाजपकडून बचतगटांना एक लाख गुढ्यांची अॉर्डर

हरी तुगावकर
सोमवार, 19 मार्च 2018

लातूर : मराठवाड्याचे अर्थकारण व राजकारणावर परिणाम करणारा देशातील
चौथा रेल्वे बोगी तयार करण्याचा कारखाना येथे होवू घातला आहे. याचे भूमिपूजन
ता. ३१ मार्चला होत आहे. यातून विकासाची गुढी उभारली जाणार आहे. या करीता
पक्षाच्या वतीने एक लाख गुढीची ऑर्डर शहरातील बचतगटाच्या महिलांना देण्यात
आली आहे. या गुढ्या घऱोघरी देवून कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाणार आहे.
त्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. चार ते पाच लाख लोकांना एकत्र आणून हा
कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची नांदी
ठरणार आहे.

गेल्या महिन्यात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व मुख्यमंत्र्यांचे स्वीय
सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे रेल्वेमंत्री पियुष गोयल व
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा कारखाना लातूरला करण्याची घोषणा करावी
लागली. ता. ३१ मार्च रोजी या कारखान्याचे भूमिपूजन होत आहे. या भूमिपूजनाचा
कार्यक्रम भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न पक्षाच्या वतीने केला जाणार आहे. किमान
चार लाख लोक कसे जमतील या करीता पक्षाच्या वतीने सुरु झाले आहेत. निलंगेकर यांनी त्याचा कृति आराखडाही तयार केला आहे. या करीता पक्षाच्या वतीने
शहरातील महिला बचतगटांच्या महिलांना एक लाख गुढी तयार करण्याची अॉर्डर देण्यात आली आहे.

यातून शेकडो महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. सर्व साहित्य पक्षाच्या वतीने या महिलांना देण्यात आले आहे. गुढीवर लावण्यात येणारा लहान तांब्या दिल्लीहून मागवण्यात आला आहे. इतर साहित्यही वेगवेगळय़ा ठिकाणावरून मागवण्यात आले आहे. एका गुढीसाठी किमान पंधरा रुपये खर्च आहे. म्हणजेच पक्षाच्या वतीने पंधरा लाख रुपये खर्च केला जात आहे. या गुढी तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर केले जात आहे.

पक्षाचे कार्यकर्ते या गुढ्या शहर व जिल्ह्यात घऱोघरी देवून कार्यक्रमाचे निमंत्रण देणार आहेत. यातून विकासाची गुढी व संस्कृती जपण्याचा प्रयत्न पक्षाच्या वतीने केला जात आहे. हा कारखाना डिसेंबर २०१८ पर्यंत उभा करण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे. तसे
सांगितलेही जात आहे. हा कारखाना तयार होईपर्यंत एखाद्या वेळेस लोकसभेच्या
निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भूमिपूजनाचा कार्यक्रमच भव्य दिव्य करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम लोकसभा
निवडणुकीच्या प्रचाराची नांदीच ठरणार आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुढी तयार करण्याचे काम आम्हा बचतगटांना देण्यात
आले आहे. सर्व साहित्य पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे. आम्ही फक्त गुढी तयार
करून देत आहोत. एक गुढी तयार करण्यासाठी एक रुपया घेत आहोत. एक महिला दिवसाला दिडशे ते दोनशे गुढी तयार करीत आहे. महिलेला कोणी सोबती असेल तर पाचशेपर्यंत गुढी तयार करीत आहेत. एक लाख गुढी तयार केल्या जात आहेत, असे रामलिंगेश्वर बचतगटाचे अध्यक्ष आशा रंजिरे यांनी सांगितले. 

Web Title: bjp gives order of 1 lack gudhi to bachatgat