भाजप सरकार जातीयवादी - जितेंद्र आव्हाड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

औरंगाबाद - मराठा समाजाने आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी ५८ मूक मोर्चे काढले. तरीही दखल न घेतल्याने अनेकांना बलिदान द्यावे लागले. मात्र, ब्राह्मण समाजाने आपल्या मागण्यांसाठी एकच मोर्चा काढला असताना सरकार लगेच पावले टाकायला लागल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी येथे लगावला. 

आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन पक्षांची ‘सोच’ जुळल्यामुळे एका अराजकीय व्यासपीठाच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधण्याची तयारी सुरू केली आहे. यात बुधवारी (ता. २३) ‘सोच से सोच की लडाई’ हा यूथ फॉर डेमोक्रसी तसेच इतर सामाजिक संस्थांतर्फे कार्यक्रम घेण्यात आला.

राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अराजकीय व्यासपीठावरून विविध क्षेत्रांतील तरुणांशी संवाद साधून धर्मनिरपेक्ष, पुरोगामी विचार आणि देशाची एकात्मता कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मत यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव कृष्णा अल्लावरू यांनी व्यक्‍त केले. आमदार आव्हाड म्हणाले, ‘‘धनंजय कुलकर्णी यांच्याकडे १७० शस्त्रे सापडली. त्याच्याजागी जर धनंजय कांबळे असता तर तो नक्षलवादी ठरला असता. त्याने वाचलेल्या पुस्तकाचे लेखकसुद्धा जेलमध्ये गेले असते. तोच कुरेशी असता तर दहशतवादी ठरविला गेला असता. जर सरकारला कुलकर्णी यांच्याकडील शस्त्रसाठा सापडणे गंभीर वाटत नसेल तर आम्हालादेखील शस्त्रे बाळगण्याची परवानगी द्यावी’’.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, तरुण पत्रकार अमेय तिरोडकर, युवा उद्योजक आणि लेखक शरद तांदळे आणि राष्ट्रीय समन्वयक मनीष शर्मा यांनीही उपस्थित तरुणांशी संवाद साधला.

Web Title: BJP government is communalist says Jitendra Awhad