esakal | गोयल यांची भाजपमधून हकालपट्टी करा : वाचा कुणी केली मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Latur News
  • संभाजी सेनेचे मागणी
  • प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन

गोयल यांची भाजपमधून हकालपट्टी करा : वाचा कुणी केली मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : ‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्यामुळे जय भगवान गोयल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे संभाजी सेनेच्या वतीने मंगळवारी दहन करण्यात आले. गोयल यांची भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

भाजपचे नेते जय भगवान गोयल यांनी ‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या दिल्ली कार्यालयात रविवारी (ता. १२) करण्यात आले. या पुस्तकामुळे मोठा वाद निर्माण आहे. गोयल यांच्याबरोबरच भाजपवर टीकेची झोड उठली आहे. लातूरातही संभाजी सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात एकत्र येऊन या पुस्तकाचा निषेध केला. शिवाय, गोयल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही केले.

या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करून गोयल यांनी देशाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे भाजपने त्यांची आपल्या पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने या वेळ करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा घोषणाही या वेळी देण्यात आल्या.

या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष सुधाकर माने, धर्मराज पवार, सुधाकर सोनवणे, अंकुश बिरादार, शशिकांत माने, योगेश देशमुख, बालाजी गायकवाड, एकनाथ काळे, प्रसाद पवार, अमोल कांदे, अजय चव्हाण, सुरज कातळे, केशव कदम, महादेव मोरे, अनिल बरबडे, ऋषि चव्हाण, राहुल मोरे यांच्यासह इतर कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले  

loading image