लातूर, उस्मानाबादचे प्रश्न राज्यपालांच्या दरबारी!    

हरी तुगावकर
Tuesday, 13 October 2020

भाजपा आमदारांच्या शिष्टमंडळाने घेतली कोश्यारींची भेट 

लातूर : लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, उजनीचे पाणी, रेल्वे सुविधा यासह विविध प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, असे साकडे सोमवारी (ता. 12) भारतीय जनता पक्षातील आमदारांच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना घातले आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील पक्षाचे सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, लातूरचे माजी पालकमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, माजीमंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील, लातूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सोमवारी राजभवन येथे भेट घेतली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तत्कालीन भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीत वरदान ठरणाऱ्या वॉटरग्रीड या प्रकल्पाला मंजुरी दिली होती, मात्र विद्यमान महाविकास आघाडी सरकार या प्रकल्पाकडे दूर्लक्ष करीत आहे. शासनाने सदरील प्रकल्पास मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, लातूर रोड ते गुलबर्गा या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली असून राज्य शासनाच्या हिशाचा 50 टक्के वाटा देऊन सदरील कामाला गती देण्यात यावी. त्याचबरोबर सोलापूर तुळजापूर रेल्वे मार्गाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, गेल्या काही दिवसात अचानक झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याबाबतीत अत्यंत चुकीच्या पद्धतीने पंचनामे होत असल्याची माहिती देऊन पिक विमा लागू करण्याची शिष्टमंडळाने राज्यपालाकडे मागणी केली.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक सिंचन प्रकल्प रखडले आहेत. या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्यात यावा. यासह विविध प्रश्नावर सविस्तरपणे शिष्टमंडळाने चर्चा करून सातत्याने दुष्काळाचे सावट निर्माण होत असलेल्या या जिल्ह्यावर विकासाच्या पायाभूत सुविधांवर भर द्यावा असे साकडे घातले.

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA meet Governor Koshyari