भाजप-राष्ट्रवादीकडून कुलगुरूंची ‘महाकोंडी’

Dr-Chopade
Dr-Chopade

औरंगाबाद - कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून होत आहेत. कुलगुरूंच्या संबंधित आर्थिक गैरव्यवहार आणि ऑडिओ क्‍लिप प्रकरणाने डोके वर काढले आहे. दोन्ही पक्षांकडून मंगळवारी (ता. १६) महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात शासनाने डॉ. एस. एफ. पाटील समिती नेमली होती. समितीचा अहवाल दाखल होऊन दीड महिने झाले; मात्र शासनस्तरावर कार्यवाही झाली नाही. दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना मंगळवारी मुंबईत निवेदन दिले. श्री. चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित विद्यापीठातील उत्कर्ष पॅनेलचे प्रमुख आहेत.

कुलगुरूंची कथित ऑडिओ क्‍लिप वादग्रस्त ठरली. यातून समोर आलेल्या बाबी गंभीर असून काही गोष्टी अभाविपशी संबंधित आहेत. याचा जाब विचारण्यासाठी भाजपप्रणित विद्यापीठ विकास मंचचे व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेतली.

विद्यापीठात सायंकाळी या भेटीदरम्यान, प्रा. गजानन सानप हेदेखील उपस्थित होते. यात कुलगुरूंची कोंडी झाल्याने प्राध्यापकांत चवीने चर्चा घडत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com