esakal | वीज दरवाढी विरोधात भाजप पदाधिकारी आक्रमक, परभणीत निदर्शने...
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

वीज वितरण कंपनीने एप्रिल ते जून या तीन महिन्याचे कुठलीही सरासरी गृहीत न धरता अंदाजे हजारो रुपयांचा भुर्दंड जनतेच्या माथी मारला आहे. अगोदरच लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना यातच वीज वितरण कंपनीने गेल्या आठवड्याभरापासून या ग्राहकांना सरासरी युनिटच्या आधारे अव्वा की सव्वा वीज बिले पाठवली आहेत. 

वीज दरवाढी विरोधात भाजप पदाधिकारी आक्रमक, परभणीत निदर्शने...

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर मिटर रिडिंग न घेता वीज वितरण कंपनीने परभणी शहरासह जिल्ह्यातील हजारो ग्राहकांना एप्रिल व जून या तीन महिन्यांचे सरासरी युनिटच्या आधारे अव्वा की सव्वा रक्कमेची वीज बिले पाठविले आहेत. सुमारे तीन महिने शहरातील सर्व व्यवहार ठप्प असताना वीज वितरण कंपनीने व्यापारी ग्राहकांकडे भरमसाठ वीज बिलाची मागणी केली आहे. वीज वितरण कंपनीच्या या धोरणामुळे जनतेमध्ये नाराजी असून वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी शुक्रवारी (ता.दहा) भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निदर्शने केली.


परभणी तालुक्यातील झरी येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत गावठाणचे काम पूर्ण झाले असून ही आजपर्यंत शेतकऱ्यांना शेतामध्ये सिंगल फेजचे कनेक्शन देण्यात आले नाही. तालुक्यातील टाकळी बोबडे, पिंगळी कोथाळा, जोडपरळी या गावात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील वीज खांबे, तारे पडली आहेत. या गावातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले तारे, वीज खांबांचे कामे करण्यात आले नाहीत. बोबडे टाकळी येथील ब्रेकर नादुरुस्त असल्यामुळे सबस्टेशन बरोबर चालत नाही, या भागातील जवळपास १५ गावे एकाच फिडरवर जोडल्यामुळे वीजपुरवठा सुरळित नाही. मागील एका महिन्यापासून ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळित होत नाही. 

हेही वाचा - Video ; रात्रीच्या दमदार पावसाने परभणी जिल्हा ओलाचिंब....

या मागण्यांचा समावेश 
राज्य सरकारमधील मंत्र्यांनी तर आधी वीज बिल माफ करण्याची घोषणा केली होती तसेच नंतर शंभर युनिटपर्यंत माफी देण्यात येईल असेही सांगितले होते. परंतू, घोषणेची अंमलबजावणी न करता उलट हजारो रुपयांचे बिल आकारण्यात आले आहे. त्यामुळे तातडीने वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी शुक्रवारी (ता.दहा) परभणी भाजपा महानगरच्या वतीने राज्य सरकार व वीज वितरण कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वाढीव वीज बिले माफ करावी व ग्रामीण भागातील विजेच्या समस्या त्वरित सोडविण्यात याव्या, शेतकऱ्यांना डीपी उपलब्ध करून देण्यात यावेत या मागणीचे निवेदन महावितरणचे मुख्य अभियंत्यांना देण्यात आले. 

हेही वाचा - हिंगोली जिल्ह्यात पाच मंडळात अतिवृष्टी, कयाधुला पूर 

अनेकांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात परभणी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी, नगरसेवक मोकिंद खिल्लारे, मधुकर गव्हाणे, मंडळाध्यक्ष सुनिल देशमुख, भीमराव वायवळ, सुहास डहाळे, विजय दराडे, भाजप तालुकाध्यक्ष संदीप जाधव, भाजप पदाधिकारी संजय शेळके, संजय रिझवानी, दिनेश नरवाडकर, अतिक पटेल, प्रशांत सांगळे, प्रभावती अन्नपुर्वे, विजय गायकवाड, चंद्रकांत चौधरी, सुधीर कांबळे,भालचंद्र गोरे, ॲड.गणेश जाधव, संजय कुलकर्णी, प्रदीप तांदळे, रामदास पवार, पूनम शर्मा, शिवाजी बोबडे, अच्युत रसाळ, पुरभाजी जावळे, दत्ता दौंड, प्रकाश घाडगे, संदीप बोरकर, डॉ.दिनेश कांबळे, बाळासाहेब शिंदे, जिजा थोरात, संतोष जाधव, सिकंदर खान, रोहित जगदाळे, आकाश पवार, अनंता गिरी, नीरज बुचाले, विष्णू शिंदे, प्रकाश कंठाळे, विठ्ठल बनशेट्टीवार, प्रकाश तिथे, बाळासाहेब साबळे, बाळू जावळे आदी सहभागी झाले होते.

(संपादन ः राजन मंगरुळकर)

loading image