‘भाजप’, ‘पवार’ समर्थकांचा जल्लोष

 भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

परभणी : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस  व उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर परभणीतील भाजप व अजित पवार समर्थकांनी शनिवारी (ता.२३) एकत्र येत जल्लोष केला.

राज्यातील सत्तास्थापनेचा घोळ सुरुच असतांना अचानक शनिवारी सकाळीच अजित पवार यांच्या पाठींबानंतर राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रीपदाची अजित पवार यांनी शपथ घेतली. या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर परभणीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी व अजित पवार समर्थकांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात कार्यकत्यांनी गुलाल उधळून केली. या वेळी एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडून आनंद साजरा केला. 

घोषणांनी परिसर दणाणला
त्यानंतर हे कार्यकर्ते स्टेशन रोड मार्गे शिवाजी चौकात आले. त्या ठिकाणी देखील पवार समर्थक व भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व घोषणा दिल्या. या वेळी परिसर दणाणून सोडला. परभणी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, माजी आमदार विजयराव गव्हाणे, माजी महापौर प्रताप देशमुख, स्वराजसिंह परिहार, संजय शेळके, संजय रिझवानी, मोहन कुलकर्णी, डॉ.मीना परतानी, दिलीप ठाकूर, प्रमोद वाकोडकर, राजेश देशपांडे, राजेश देशमुख, विलास चांदवडकर, नगरसेविका मंगल मुद्गलकर, मधुकर गव्हाणे, मोकिंद खिल्लारे, अशोक डहाळे, प्रशांत सांगळे, सुनिल देशमुख, रितेश जैन, बाळासाहेब देशमुख, अंकुश आवरगंड, संदीप जाधव, सदाशिव नाईक, अतिक पटेल, नितीन वटमवार, चंद्रकांत डहाळे, अनंत देशपांडे, राधाजी शेळके, मनोज पिल्ले, विजय गायकवाड, विजय दराडे, भालचंद्र गोरे, प्रदिप तांदळे, रामदास पवार, माधवी घोडके, विजया कातकडे, सुनिता घुगे, शंकुतला मठपती, पूनम शर्मा, सुहास डहाळे, संजय कुलकर्णी, अब्दुल बारी, सिकंदर खान, संतोष सोनवणे, संजय शामरथी, शिवाजी शेळके, संदिप शिंदे, रोहित जगदाळे, अनंता गिरी, निरज बुचाले, अक्षय डहाळे, अंकुश जोगदंड, संतोष भारती, प्रविण गायकवाड, संतोष सामाले, पुरभाजी जावळे, बाळासाहेब साबळे, बंडू झाडे, राजेभाऊ झाडे, शिवाजी तरवटे, भानुदास जवंजाळ, अरुण कदम, आकाश पवार, स्पंदन देवडे, संजय भागवते, अशोक पारवे, विशाल बोबडे आदी उपस्थितीत होते.


 

पूर्णा येथे जल्लोष...
पूर्णा येथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस  व उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर ठिकठिकाणी भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला. या वेळी गुलालाची उधळण करत फटाके फोडण्यात आले. भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com