लोकसभेच्या 48 जागांची भाजपची तयारी

bjp
bjp

जालना : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 48 जागांची तयारी करण्यात येत आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी (ता. 25) जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, आमदार अतुल सावे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

यावेळी प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले, की मागील दीड महिन्यात राज्याचा दौरा केला आहे. राज्यातील 48 पैकी 46 लोकसभा मतदार संघाचा दौराकरून आढावा घेतला आहे. तर रायगड आणि रत्नागिरी या दोन लोकसभा मतदार संघाचा ता.30 जानेवारीनंतर दौरा केला जाणार आहे. सध्या भाजपकडून 48 लोकसभेच्या जागा लढविण्याची तयारी केली आहे. समविचारी पक्षांनी एकत्र यावे, मताच विभाजन टळावं, त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला फायदा होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. युती झाल्यास आम्ही काम केलेल्या लोकसभा मतदार संघात मित्रपक्षाला फायदा होईल असा दावाही यावेळी दानवे यांनी केली.

दरम्यान येत्या सोमवारी (ता. 28) जालना येथे कलशसीडस् येथील मैदान येथे भाजपची राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राज्यातील सर्व मंत्री, पक्षाचे पदाधिकारी, बाराशे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मागील राज्य कार्यकारिणी बैठकीचा आढावासह कृषी आणि राज्यकीय ठराव घेण्यात येणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे, असे ही दानवे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com