भाजप-शिवसेनेचे मुंबईकडे लक्ष 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - युतीचा काडीमोड झालेला असल्याने आता शिवसेना आणि भाजप नेत्यांचे लक्ष मुंबईत युती होते का, याकडे लागले आहे. जिल्हा परिषदेत भाजप सर्वांत मोठा पक्ष असला तरी त्यांना कॉंग्रेसचा पाठिंबा मिळण्याची कोणतीही शक्‍यता नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून शिवसेनेच्या टेकूची गरज पडणार आहे. आता यासाठी जिल्ह्यातील भाजपच्या संसदीय मंडळाची शनिवारी (ता.25) बैठक होणार असून यामध्ये शिवसेनेला सत्तेतसाठी टाळी देण्यासंबंधी निर्णय घेतला जाणार आहे. अगोदर स्थानिक स्तरावर चर्चा केल्यानंतर भाजपकडून वरिष्ठांना याबाबत माहिती दिली जाणार आहे. 

औरंगाबाद - युतीचा काडीमोड झालेला असल्याने आता शिवसेना आणि भाजप नेत्यांचे लक्ष मुंबईत युती होते का, याकडे लागले आहे. जिल्हा परिषदेत भाजप सर्वांत मोठा पक्ष असला तरी त्यांना कॉंग्रेसचा पाठिंबा मिळण्याची कोणतीही शक्‍यता नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून शिवसेनेच्या टेकूची गरज पडणार आहे. आता यासाठी जिल्ह्यातील भाजपच्या संसदीय मंडळाची शनिवारी (ता.25) बैठक होणार असून यामध्ये शिवसेनेला सत्तेतसाठी टाळी देण्यासंबंधी निर्णय घेतला जाणार आहे. अगोदर स्थानिक स्तरावर चर्चा केल्यानंतर भाजपकडून वरिष्ठांना याबाबत माहिती दिली जाणार आहे. 

जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारत सहा जागांवरून थेट 22 जागांवर विजय मिळविला आहे. तर एक पुरस्कृत उमेदवार विजय झाला. त्यामुळे त्यांची संख्या 23 झालेली आहे. जिल्हा परिषदेत 62 गट असल्याने बहुताचा आकडा हा 32 आहे. यामध्ये शिवसेनेच्या 18 जागांचा सोबत घेतल्या तर हा आकडा 41 होतो. सध्याच्या स्थितीत भाजपसमोर शिवसेनेला सत्तेसाठी टाळी देण्याशिवाय पर्याय राहिला नाहीत. राज्यभरात युती तुटलेली असल्याने स्थानिक नेत्यांचे मुंबईकडे डोळे लागले आहे. मुंबईत निर्णय होण्याअगोदर औरंगाबाद जिल्ह्यातील भाजपचे स्थानिक नेते बैठक घेऊन चर्चा करणार आहे. यानंतर शिवसेनेला आमंत्रण द्यायचे किंवा नाही याविषयी वरिष्ठांना माहिती दिली जाण्याची शक्‍यता आहे. 

सध्या सत्तेच्या समीकरणात मुंबईत कॉंग्रेस शिवसेनेला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत करण्याविषयी चर्चा केली जात. औरंगाबादेत जर शिवसेनेला कॉंग्रेसने पाठिंबा दिला तर शिवसेना 18 आणि कॉंग्रेसच्या 16 जागा एकत्र केल्या तर हा आकडा 34 होतो म्हणजे बहुमतापेक्षा दोन अधिक हे समीकरण जुळण्याची शक्‍यता कमीच आहे. त्यामुळे भाजपकडून आता सत्तेसाठी वेगवान हालचाली करून शिवसेनेला सोबत घेण्याचाच विचार केला जात आहे. 

भाजपकडून अध्यक्षपदासाठी खल 
जिल्हा परिषदेच पहिल्या अडीच वर्षांत ओबीसी महिलेसाठी अध्यक्षपद राखीव असल्याने कोणत्या ओबीसी महिलेस अध्यक्षपद करता येईल यासाठी भापजपकडून आतापासूनच खल केला जात आहे. भाजपकडून 22 पैकी 12 महिला उमेदवार विजयी झालेल्या आहेत. जिल्हा परिषदेत एकूण 17 गट ओबीसींसाठी राखीव होते. त्यामध्ये 9 गट हे ओबीसी महिलांचे होते. यातील दोन गटांत पुष्पा काळे (आमखेडा), छाया अग्रवाल (शेंदुरवादा) याविषयी झालेल्या आहे; तसेच इतर महिला सर्वसाधारण; तसेच महिला गटातून विजयी झालेल्या आहेत. यातील अनुराधा चव्हाण यांच्यासह पाच ते सहा महिला सदस्यांकडे ओबीसीचे जातवैधता प्रमाणपत्र आहे. आता यातून कोणत्या महिलेच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकायाची, यासाठी स्पर्धा लागण्याची शक्‍यता आहे. 

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी शनिवारी भाजपच्या संसदीय मंडळात चर्चा केली जाणार आहे. यामध्ये शिवसेनेला सोबत घेण्याविषयी अगोदर स्थानिक स्तरावर चर्चा करून त्याची माहिती वरिष्ठांना दिली जाणार आहे. यानंतर वरिष्ठ याबाबत अंतिम निर्णय घेतील. 
- एकनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजप 

भाजपकडून विजयी 
महिला उमेदवार 
पुष्पा काळे (आमखेडा) 
छाया अग्रवाल (शेंदुरवादा) 
सरला बनकर (अजिंठा) 
शिल्पा गरुड (घाटनांद्रा) 
अनिता मोठे (भवन) 
रेणुका जाधव (देवगाव रंगारी) 
अनुराधा चव्हाण (गणोरी) 
हिंदवी पवार (वेरूळ) 
सपना पवार (शिऊर) 
उषा हिवाळे (रांजणगाव शेणपुंजी) 
रेखा नांदुरकर (वडगाव कोल्हाटी गट 49) 
ज्योती चोरडिया (वडगाव कोल्हाटी गट 50) 

Web Title: The BJP-Shiv Sena Mumbai attention