भाजपला काँग्रेसचा मदतीचा ‘हात’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

उदगीर - नगर परिषदेच्या विविध विषय समितींच्या पदाधिकारी निवडीसाठी बुधवारी (ता.१६) पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या उपस्थितीत नगर परिषदेच्या सभागृहात बैठक पार पडली.

स्वच्छता व आरोग्य सभापतिपदी उपाध्यक्ष भाजपचे सुधीर भोसले, बांधकाम सभापती रामचंद्र मुक्कावार, पाणीपुरवठा सभापती मनोज पुदाले, नियोजन सभापती रामेश्वर पवार, शिक्षण सभापती काँग्रेसच्या मिर्झा रेश्‍मा जबीन अक्रम बेग यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी भाजपच्या श्रद्धा पाटील व एमआयएमच्या हाश्‍मी सय्यद रेश्‍मा या दोघांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक होऊन श्रद्धा पाटील यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीच्या सदस्यपदी भाजपाचे बापूराव यलमटे, काँग्रेसच्या फैज महंमद गुलाम पठाण, राजकुमार भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. सभागृहातील नगरसेवकांचे संख्याबळ पाहता भाजपला ‘एमआयएम’च्या सहकार्याची आवश्‍यकता असल्याने त्यांना समित्यांच्या निवडीत स्थान द्यावे लागत असे. मात्र या निवडणुकीत भाजपाला काँग्रेसची साथ मिळाल्याने एमआयएमला बाजूला करीत निवडी करण्यात आल्याने नगर परिषदेच्या सभागृहातील भाजपा-काँग्रेसचे सख्य असल्याचे या निवडणुकीने दिसून आले. 

Web Title: BJP supports Congress in udgir nagar parishad