Lok Sabha 2019 : नांदेडसह मराठवाड्यातील शिवसेनेच्या 'या' जागेवर भाजपचा डोळा

BJP targets to gain Nanded and Hingoli LS seat in Lok Sabha 2019 elections
BJP targets to gain Nanded and Hingoli LS seat in Lok Sabha 2019 elections

नांदेड : आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्ष बळकटीसाठी राज्यभर दौरे सुरु आहेत. विशेष लक्ष नांदेड लोकसभेवर असून, त्याचबरोबर, शिवसेनेसाठी महत्वाची असणाऱ्या हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठीही भाजपकडून चाचपणी चालू आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये या दोन जागेवर यंदा भाजपचा खासदार निवडून आणण्याचा निर्धार आम्ही केल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे.

कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीनिमित्त ते नांदेडला सोमवारी (ता. 26) आले होते. त्यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर, महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे, सरचिटणीस प्रवीण साले यावेळी उपस्थित होते.

दानवे म्हणाले की, २०१४ प्रमाणेच लोकसभा आणि विधानसभा भारतीय जनता पक्षाच्याच हातात राहील, याची दक्षता आम्ही घेत आहोत. त्यासाठी राज्यभर दौरे करून कार्यकर्त्यांमध्ये संघटनात्मक बांधणी पूर्ण करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एका बुथवर २३ प्रकारची कामे कार्यकर्त्यांना दिलेली आहेत. त्यादृष्टीने कार्यकर्ते कामालाही लागलेले असल्याचे श्री. दानवे यांनी सांगितले.

मोदी आणि फडणवीस पुन्हा आणण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज करणे, संघटनात्मक बाबी पूर्ण करणे हा पहिल्या टप्प्यातील दौऱ्यांचा मुख्य हेतू आहे. विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, रावेर, ठाणे, कल्याण, भिवंडी मराठवाड्यात जालना, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद आज नांदेड, परभणी आणि हिंगोली येथे कार्यकर्ता आढावा बैठक घेतल्या. त्यात कार्यकर्ते स्ट्रॉंग झाल्याचे जाणवले.
- रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

ते म्हणाले की, मतांचे विभाजन होऊन कदापीही काँग्रेस-राष्ट्रवादीला त्याचा फायदा होऊ नये, म्हणून सर्व समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आमचा सुरु आहे. त्यांनीही स्वतःहून ती भूमिका घ्यावी. २०१४ मध्ये राज्यात लोकसभेच्या दोनच जागा कॉंग्रेसला जिंकता आल्या. एक म्हणजे हिंगोली आणि दुसरी नांदेड. परंतु, आगामी निवडणुकीत या दोन्ही जागा भारतीय जनता पक्षाकडे कशा येतील, याकडे जास्त लक्ष आहे. विधानसभा आणि लोकसभेसाठी उमेद्‍वारासाठी नवीन चेहरे असंख्य आहेत. परंतु, कोणाला उमेदवारी द्यायची, कोणाला नाही हे आत्ताच सांगता येणार नाही, असेही श्री. दानवे यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com