भाजपने शिवसेना संपविन्याचा प्रयत्न केला; मंत्री रामदास कदम

उमेश वाघमारे
गुरुवार, 28 जून 2018

जालना  : शिवसेना पक्षप्रमुख बाबाळासाहेब ठाकरे यांच्या बोटाला धरून महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेची मदती घेतली. शिवसेनेसोबत राहून शिवसेनाला कमी करण्याचे काम भाजपनी केले आहे, अशी टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी (ता.28) जालना येथे शिवसेनेच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधी प्रशिक्षण शिबिरात केली.

यावेळी रामदास कदम म्हणाले, की महाराष्ट्रात भाजप पक्ष शिवसेनेच्या मदतीने मोठा झाला. ज्या जागा सहज निवडून येतील अशा जागा भाजपच्या नेत्यांनी गोडबोलूं घेतल्या आणि शिवसेनेच्या मदतीने ते मोठे झाले. पण भाजपने शिवसेनाला मदत केली नाही,  शिवसेनेसोबत राहून शिवसेनेला संपविन्याचा भाजपने प्रयत्न केला.

आता शिवसेना त्यांना मुळासगट उखडून काढीन अशी टीका पर्यावण मंत्री रामदास कदम यांनी केला. भाजप नेत्यांनी राम मंदिरचे नाव घेण्यास सुरवात केली, की निवडणूका जवळ आल्या म्हणून समजून जा. पंतप्राधन नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर उभरनीसाठी एक वीट आणि 100 रूपये गोळा केले होते. त्याच वीटांचा वापर करून भाजप कार्यालय उभा केले आहेत आणि गोळा केलेल्या 100 रुपयांमधून गावंडी दिल्याचा आरोप ही श्री. कदम यांनी केला आहे.

Web Title: bjp tried to distroy shivsena