निलंग्यात संभाजी पाटलांची आजोबा, काकांवर मात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

अनेक वर्षांनंतर निलंग्यात भाजपचे कमळ फुलले असून संभाजी पाटील यांनी आजोबा शिवाजीराव व काका अशोक पाटील निलंगेकर यांच्यावर मात केली आहे. 20 पैकी 14 जागा जिंकत भाजपने सत्तांतर घडवून आणल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. कॉंग्रेसचे 6 उमेदवार निवडून आले आहेत. 

लातूर - लातूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीपैकी काही निकाल लागले असून अपेक्षेप्रमाणे निलंगा पालिका कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यातून आपल्याकडे मिळवण्यात राज्याचे कामगार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना यश आले आहे.

अनेक वर्षांनंतर निलंग्यात भाजपचे कमळ फुलले असून संभाजी पाटील यांनी आजोबा शिवाजीराव व काका अशोक पाटील निलंगेकर यांच्यावर मात केली आहे. 20 पैकी 14 जागा जिंकत भाजपने सत्तांतर घडवून आणल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. कॉंग्रेसचे 6 उमेदवार निवडून आले आहेत. 

औसामध्ये घड्याळाची टिकटिक 
निलंग्यात भाजपने बाजी मारली असली तरी औसा नगरपालिकेत त्यांना हार पत्करावी लागली आहे. याठिकाणी राष्ट्रवादीने सत्ता मिळवली. औसामध्ये राष्ट्रवादीचे अफसर शेख नगराध्यक्षपदी निवडून आले तर सर्वाधिक 12 नगरसेवकही विजयी झाले आहेत. 6 जागांसह इथे भाजप दुसऱ्या तर कॉंग्रेस 2 जागांसह तिसऱ्या स्थानावर आहे. 

अहमदपूरात त्रिशंकू 
अहमदपूर नगरपालिकेच्या 23 जागांपैकी राष्ट्रवादी 9, भाजप 6, शिवसेना 2, कॉंग्रेस 2 तर बहुजन विकास आघाडीचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत. नगराध्यक्षपदी बहुजन विकास आघाडीच्या अश्विनी कासनाळे विजयी झाल्या आहेत. अहमदपुरात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. 

उदगीरात एमआयएमचा जोर 
उदगीर नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार सय्यद ताहेर हे अडीच हजार मतांनी आघाडीवर आहेत. नगराध्यक्षपदी जरी एमआयएमचा उमेदवार विजयी झाला तरी उदगीरमध्ये देखील त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार एमआयएम 7, भाजप, 7 व कॉंग्रेस पक्षाला 7 अशा समान जागांवर विजय मिळाला आहे

Web Title: bjp wins in nilanga