दुष्काळ निवारणासाठी भाजप युवा मार्चाचाही हातभार

प्रकाश बनकर | Wednesday, 12 June 2019

मोर्चाचे प्रदेश सचिव राजेंद्र साबळेतर्फे मुख्यमंत्र्याकडे एक लाखाची मदत

औरंगाबाद : राज्यात पडलेल्या दुष्काळामूळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारतर्फे विविध उपाय-योजना केल्या जात आहे. दुष्काळासाठी आता भाजपच्या युवा मोर्चानेही पुढकार घेतला आहे. मोर्चाचे प्रदेश सचिव राजेंद्र साबळे यांच्यातर्फे दुष्काळ निवारणासाठी एक लाख रुपयांची मदत केली.

मंगळवारी (ता.दहा) एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सु्पूर्त करण्यात आला आहे. राज्यात दुष्काळी स्थिती असल्याने विविध संस्था पुढे येत शासनाच्या माध्यमातून दुष्काळ निवारणासाठी मदत करीत आहे. या मदतीच्या माध्यमातून चारा छावणी, चारा खरेदी, पिण्याचे टॅंकरची मदत दुष्काळी भागात करीत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रेरणा घेऊन साबळे यांनी ही मदत उभी केली आहे. मुळ औरंगाबादचे असलेले साबळे यांनी मराठवाड्यातील दुष्काळासाठी हातभार लागावा याच उद्देशाने शासनाकडे ही मदत दिली असल्याचे 'सकाळ'ला सांगितले. यासह अनेक सामाजिक कामे साबळे करीत आहेत. त्यांना आमदार योगेश टिळेकर, आमदार संतोष दानवे, संजय कोडगे यांचे मार्गदर्शन लाभले. 

दुष्काळासाठी फुल ना फुलांची पाकळी म्हणून मी काही मदत केली आहे. माझ्या मदतीने दुष्काळ मिटेल असे नाही,पण उपाय-योजनेत माझ्या या मदतीच्या रुपाने थोडा हातभार राहिल. याचे समाधान मिळले. - राजेंद्र साबळे पाटील, प्रदेश सचिव, भाजप युवा मोर्चा.