कॉंग्रेसच्या प्रतिष्ठेला भाजपचे आव्हान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

लातूर - (कै.) विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख हे जिल्हा परिषदेच्या एकुरगा गटातून निवडणूक लढवीत असल्याने या गटाकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. श्री. देशमुख हे जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी कसे विजयी होतील याकरिता कॉंग्रेसने कंबर कसली आहे, तर भारतीय जनता पक्षाचे साहेबराव मुळे यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. 

मांजरा पट्ट्यातील हा गट आहे. नव्याने तयार झालेल्या या गटात एकुरगा, बोपला, टाकळी, चाटा, भोयरा, मुरुड अकोला, साखरा, चिंचोलीराव, चिंचोलीराव वाडी, अंकोली, शिऊर, उटी, धानोरी, सावरगाव या गावांचा समावेश आहे. 

हा गट सर्वसाधारणसाठी खुला आहे. या गटातून कॉंग्रेसचे धीरज देशमुख, भाजपचे साहेबराव मुळे, शिवसेनेचे ज्ञानोबा सूर्यवंशी, अपक्ष म्हणून विशाल वाघमोडे, तय्यब सय्यद हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पंचायत समितीचा एकुरगा गण हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. यात कॉंग्रेसकडून रागिणी पाटील, भाजपकडून भाग्यश्री घुटे, शिवसेनेकडून लक्ष्मी गाडे, तर अपक्ष म्हणून सुरेखा आडसूळ या निवडणूक लढवीत आहेत. तर चिंचोलीराव गण हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. यात कॉंग्रेसचे पंडितराव अडसुळे, भाजप राजकुमार कलमे, शिवसेनेकडून सचिन पुरी, तर अपक्ष म्हणून विशाल वाघमोडे हे निवडणूक लढवीत आहेत. 

कॉंग्रेसची प्रतिष्ठा अन्‌ भाजपचे आव्हान 
कॉंग्रेससाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख व आमदार अमित देशमुख यांच्यासाठी या गटाची निवडणूक महत्त्वाची आहे. श्री. देशमुख सर्वाधिक मताधिक्‍यांनी कसे निवडून येतील याकरिता कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. स्वतः धीरज देशमुख हे रात्रंदिवस या मतदारसंघात फिरत आहेत. तर भाजपच्या दृष्टीने देखील हा गट महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळेच पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी याच गटातून प्रचाराचा प्रारंभ करून एक प्रकारे कॉंग्रेसला आव्हान दिले आहे. भाजपचे कार्यकर्ते देखील कामाला लागले आहेत.

Web Title: BJP's challenge to Congress