Video: शेतकरी, नागरी समस्यांविरोधात भाजपचे जिल्हाभरात धरणे

file photo
file photo

परभणी : शेतकऱ्यांची फसवणुक, महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या निषेधार्थ व परभणी महापालिकेच्या गलथान कारभाराविरोधात भारतीय जनता पक्षाचे मंगळवारी (ता.२५) जिल्हाभरातील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. परभणी तहसील कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी केले.

जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना - काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे. आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे मंगळवारी (ता.२५) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. भाजपचा विश्वासघात करून काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेससबरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वास घात केला आहे, असा आरोप या वेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
 सरकार स्थापन करीत असतांना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना त्यांच्या आश्वासनाचा विसर पडला आहे. 


 शेतकऱ्यांची फसवणूक 
सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू अश्या घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही. महाआघाडी सरकारची कर्जमाफी योजनाही शेतकऱ्यांची सरसकट फसवणुक करणारी आहे असा आरोप यावेळी आनंद भरोसे यांनी यावेळी केला. भाजप सरकारच्या काळात ४३ लाख खातेधारकांना १९ हजार कोटींचा लाभ मिळाला होता. परंतू महाविकास आघाडीच्या सरकारने त्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्याकडून होणाऱ्या खरेदीचे प्रमाण खुप कमी झाले आहे. यातून शेतकऱ्यांची फसवणुक झाली असे त्यांनी सांगितले. 


 महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ
महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करून मंगळवारी (ता.२५) परभणी तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महापलिकेतील गटनेत्या मंगला मुदगलकर, माजी जिल्हाध्यक्ष अभय चाटे, सुनील देशमुख, रितेष झांबड, मधुकर गव्हाणे, सुहास डहाळे, भीमराव वायवळ, मुकूंद खिल्लारे, दिनेश नरवाडकर आदींची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com