'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'

'पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे भाजपा युवामोर्चाचे प्रयत्न'

हिंगोली- राज्यात भाजपा तर्फे आयोजित सीएम चषकाच्या माध्यमातून 75 दिवसांमधे पन्नास लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न असून त्यांना पक्षासोबत जोडण्याचा उद्देश असल्याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे कळमनुरी विधानसभा प्रभारी शिवशंकर घुगे यांनी सकाळशी बोलतांना दिली आहे. 

याबाबत घुगे यांनी सांगितले की, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमही यात घेतले जात आहेत. या माध्यमातून पक्ष मजबुतीसाठी राज्यातून पन्नास लाख युवकांना भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्षाशी थेट जोडण्याचा प्रयत्न आहे. 

यामध्ये विधानसभा मतदार संघस्तरावर झालेल्या स्पर्धेनंतर ता. 5 डिसेंबर ते 31 डिसेंबर या काळात जिल्हास्तरीय स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील भाजपाचे नेते व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. या स्पर्धांचा समारोप युवा दिनी ता. 12 जानेवारीला राज्यस्तरावर होणार आहे. 

या स्पर्धांमधे आयुष्यमान भारत क्रिकेट, जलयुक्त शिवार व्हॉलीबाल, शेतकरी सन्मान कबड्डी, सौभाग्य खो-खो, उडान एथलेटिक्स, मुद्रा योजना बुद्धिबळ, स्वछ भारत कुस्ती, कौशल्य भारत कॅरम आदी मुख्य खेळाचा समावेश आहे. तर सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये उज्वला नृत्य स्पर्धा, जनधन एकांकीका स्पर्धा, उजाला गायन स्पर्धा, ग्रामज्योती काव्यवाचन स्पर्धा, इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धा, मेक इन इंडिया रांगोळी स्पर्धा आदींचा समावेश आहे. 

या चषकामध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे. विजेते आणि उपविजेत्यांना रोख पारितोषिके, तसेच विशेष चषक, पदके देण्यात येणार आहेत. सहभागी सर्व खेळाडूंसाठी मुख्यमंत्र्याची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असल्याचे घुगे यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com