भेंडाळा शिवारात वाहनाच्या धडकेत काळवीटचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

भेंडाळा (ता.गंगापूर) शिवारात अन्नपाण्याच्या शोधात भटकंती करणारा काळवीट शनिवारी (ता.14) सकाळी औरंगाबाद-नगर राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना वाहनाच्या घडकेत जखमी होऊन उपचाराअभावी मृत पावला. या परिसरात रानडुकरे, हरिण, काळवीट आदी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर आहेत. ते अन्नपाण्याच्या शोधात नेहमी भटकंती करीत असतात. आणि याच भागातून औरंगाबाद-नगर राष्ट्रीय महामार्ग गेला असल्याने वाहने भरधाव वेगात धावत जात असतात.

कायगाव  (जि.औरंगाबाद) : भेंडाळा (ता.गंगापूर) शिवारात अन्नपाण्याच्या शोधात भटकंती करणारा काळवीट शनिवारी (ता.14) सकाळी औरंगाबाद-नगर राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना वाहनाच्या घडकेत जखमी होऊन उपचाराअभावी मृत पावला. या परिसरात रानडुकरे, हरिण, काळवीट आदी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर आहेत. ते अन्नपाण्याच्या शोधात नेहमी भटकंती करीत असतात. आणि याच भागातून औरंगाबाद-नगर राष्ट्रीय महामार्ग गेला असल्याने वाहने भरधाव वेगात धावत जात असतात.

यात वन्यप्राणी शिकारीच्या मागे पळत असताना वाहनांची धडक लागून जखमी होतात. अशाच प्रकारची घटना शनिवारी घडली. या रस्त्यावरील पेंढारकर फार्म पाटीजवळ एक काळवीट अज्ञात वाहनाच्या घडकेत जखमी होऊन उपचाराअभावी मृत पावला. याबाबत वनविभागाशी संपर्क करण्यासाठी अनेकांकडे त्यांचा मोबाईल क्रमांक नसतो.

वनविभागाचे अधिकारी आजारी अन्‌ बेफिकिरीपणा

शनिवारी रात्री उशिरा सात वाजून चौतीस मिनिटाला वनरक्षक कविता निकुळजे यांना फोन केला, तर त्या आजारी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वनपाल डी.जे.तेरके यांना संपर्क केला असता ते पण आजारी असल्याचे सांगण्यात आले. ते म्हणाले, आमच्याकडे वन कर्मचारी कमी असल्याने सर्व ठिकाणी पोचणे शक्‍य नाही. तुम्हीच ते काळवीट त्या ठिकाणी आहे का नाही, सकाळी मला सांगा, मी गाडी पाठवतो.
दरम्यान जुने कायगाव, जुने अमळनेर, जुने जामगाव भागात गोदावरी पुराचे पाणी आल्याने या भागातील कुरण, लपनक्षेत्र पाण्यात गेले. त्यामुळे वन्यप्राणी आता सुरक्षित ठिकाणी सरसावले आहेत. मात्र या भागातून हायवे गेल्याने रस्ता ओलांडत असताना अनेकदा हरिण, काळवीट जखमी होतात आणि वन विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने मृत पावण्याच्या घटना वाढत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Black Dear Died In Accident