जादूटोणा विरोधी कायद्याला पोलिसांकडूनच फाटा!

Shyam-Manav
Shyam-Manav

पैशांच्या पाऊसप्रकरणी केवळ फसवणुकीचा नोंदविला गुन्हा
औरंगाबाद - समाजातील अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रयत्नांनंतर जादूटोणा विरोधी कायद्याची निर्मिती झाली; परंतु अंमलबजावणीबाबत फारशी अनुकूलता नसून पैशांचा पाऊस प्रकरणात केवळ फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. विशेषत: जादूटोणा विरोधी कलमांचा समावेश करणे गरजेचे असूनही सोयिस्करपणे या कायद्यालाचा फाटा दिला गेल्याची बाब स्पष्ट झाली आहे. 

गत अनेक वर्षांपासून औरंगाबादेतील नारेगावचा साहेबखान पठाण ऊर्फ सत्तार बाबा राज्यातील अनेक गरीब, पिचलेले, शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या व्यापाऱ्यांना गंडवीत आहे. पैशांचा पाऊस पाडून दाखवितो, कोट्यधीश बनवतो, असे सांगून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी कृत्य करतो. त्याच्या या कारनाम्याचा प्रकार पहिल्यांदा जुलै २०१४ ला उजेडात आला. १८ जुलै २०१४ ला त्याला अटकही झाली होती. त्यानंतर गत आठवड्यात हैद्राबादेतील डोडू सत्यनारायण यांना पैशांचा पाऊस पाडून कोट्यधीश बनवतो, अशी थाप मारून त्यांची त्याने चार मे रोजी अकरा लाखांची फसवणूक केली.

यातही गुन्हा नोंद झाला; पण केवळ फसवणुकीचाच.  पोलिसांनी बाबाला पकडल्यानंतर त्याच्याकडील लाल कपड्याच्या पिशवीतून अकरा लिंबू, एक नारळ, अगरबत्ती, तीन औषधांच्या बाटल्या, दगडासारखे खडे उलथल्याचे डोडू सत्यनारायण यांनी तक्रारीत स्पष्टपणे नमूद केले; परंतु तक्रार नोंदविताना या बाबीच पोलिसांनी वगळल्या. विशेषत: बाबाकडून पैशांचा पाऊस पाडून दाखवितो, असा दावाही चमत्काराचाच भाग आहे. तरीही पोलिसांनी जास्तीचे काम नको म्हणून केवळ फसवणुकीचा गुन्हा नोंदवून जादूटोणा कायद्याच्या अंमलबजावणीची ऐशी की तैशी करून बाबाला अभय दिल्याचे दिसते.

एखादी व्यक्ती फसवणूक, आर्थिक प्राप्तीसाठी चमत्काराचा दावा करीत असेल, हातचालाखीच्या बळावर चमत्कार करीत असेल तर अनुसूची कलम २ नुसार हा गुन्हा ठरतो. 
- डॉ. श्‍याम मानव, अध्यक्ष, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com