सोशल मीडियाच्या अफवेतून मध्यप्रदेशच्या दोन बहुरुप्याना औरंगाबादेत बेदम मारहाण

मनोज साखरे
शुक्रवार, 15 जून 2018

औरंगाबाद - परराज्यातुन औरंगाबादेत अनेकजण गुन्हा करण्याच्या उद्देशाने आल्याच्या अफवा सोशल मीडियावर जोम धरत आहेत. या अफवेतूनच मध्यप्रदेशातील दोन तरुणांना औरंगाबादेतील पडेगाव-कासंबरीनगर येथे अडीच तास बेदम मारहाण झाली. हि घटना शुक्रवारी (ता. 15) सकाळी साडेसहा ते नऊ दरम्यान घडली.

विक्रमनाथ लालुनाथ (वय 38) व मोहननाथ भैरवनाथ (वय 35) अशी बेदम मारहाण झालेल्यांची नावे आहेत. दोघे मूळ मध्यप्रदेश येथील आहेत. दोन महिन्यांपासून ते औरंगाबाद शहरात वास्तव्यास आहेत. शहरात ते बहुरप्याची सोंग घेत आपला चरितार्थ चालवतात. शुक्रवारी ईद असल्याने ते पडेगाव परिसरातील कासंबरीनगर येथे भिक्षुकीसाठी गेले होते. काहींनी त्यांना पैसेही दिले पण नंतर सुमारे दोनशे ते तीनशेचा जमाव त्यांच्यावर चालून आला. लाठ्या काठ्यांनी त्यांना मारहाण केली. सकाळी साडे सहापासून ते नऊपर्यंत त्यांना मारहाण सुरु होती. हि बाब पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांची जमावाच्या तावडीतून सुटका केली.

Web Title: Blasphemy between two policemen of Madhya Pradesh in Aurangabad