अंधांची काठी झाली डिजिटल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

नांदेड - अंध व्यक्तींसाठी काठी (स्टीक) हाच त्यांचा मोठा आधार असतो. काठीच्या साह्याने अंदाज घेत ते चालतात खरे, मात्र अंदाज चुकलाच, तर अनेकदा त्यांना अपघातांनाही सामोरे जावे लागते. याच समस्येवर तोडगा म्हणून नांदेडच्या ओम व्यंकटराव पाटील या विद्यार्थ्याने ही डिजिटल स्टीक तयार केली आहे. यासाठी त्याने कॅमेरा आणि ब्लू टूथचा वापर केला.

पुण्याच्या "व्हीआयटीएम' महाविद्यालयातून ओम पाटील याने बी. टेक. इलेक्‍ट्रॉनिक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी त्याने तीन महिने पुणे परिसरातील अंध मुलांच्या शाळेत जाऊन त्यांच्या समस्यांचा अभ्यास केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अंध विभागास भेट देऊन त्याने डॉ. श्री. भोये, डॉ. मनोहर डोळे यांचे मार्गदर्शन घेतले. अंधांची काठी अधिकाधिक स्मार्ट कशी होईल, यासंदर्भात वडिलांची सतत प्रेरणा मिळत होती. त्यातूनच या संशोधनाचा जन्म झाल्याचे ओम पाटील सांगतो. ही स्मार्ट स्टीक संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेमार्फत राष्ट्रीय मानवरहित रोबोटिक्‍स स्पर्धेच्या प्रदर्शनातही ठेवण्यात आली होती. त्यातही या प्रयोगाचे कौतुक झाल्याचे तो सांगतो.

...अशी काम करते स्टीक
या डिजिटल स्टीकमध्ये कॅमेरा बसविण्यात आला असून, त्याला ब्लू टूथची जोडणी आहे. यामुळे चार मीटर अंतरावरील अडथळ्यांचे संकेत अंध व्यक्तीस मिळतात. यात रोबोचिप प्रोसेस व कोडींगचाही वापर केला आहे. त्यामुळे रस्त्यावरील अडथळा नजीक येताच काठी कंपनांद्वारे धोक्‍याचे संकेत देते. विशेष हे, की अंध व्यक्तीच्या दिशेने एखादे वाहन येत असेल तर, स्टीकला बसविलेला कॅमेरा स्पीकरच्या माध्यमातून संकेत देतो. शिवाय आजूबाजूच्या अडथळ्यांविषयी माहिती विचारल्यास स्टीक उत्तरही देते.

Web Title: blind stick digital sticke om patil