शिक्षकाच्या मृत्यूनंतर औरंगाबादमध्ये रास्ता रोको

शिक्षकाच्या मृत्यूनंतर औरंगाबादमध्ये रास्ता रोको

औरंगाबाद: औरंगाबादेतील पैठण रस्त्यावर भरधाव आयशरच्या धडकेत नृत्यशिक्षक ठार झाल्याने मंगळवारी (ता. 20) सकाळी 10 च्या सुमारास संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला, परिणामी बीड बायपास व रेल्वेस्थानकाकडून येणारी वाहतूक अर्ध्या तासापासुन ठप्प झाली.

शिक्षक संतोष गायकवाड यांचा रास्ता ओलांडताना सोमवारी अपघातात मृत्यू झाला. दुचाकीला आयशरने धडक दिल्यानंतर हेल्मेटसह डोके चिरडले यात ते जागीच गतप्राण झाले होते. एक महिन्यात याच परिसरात तीन जण अपघातात ठार झाले. त्यामुळे इटखेड्यातील नागरिकांनी पैठण रस्त्यावर येत ठिय्या मांडला. गतिरोधक आणि सिग्नल बसवण्याची त्यांची मागणी आहे.

दरम्यान, पैठणकडून शहरात येणारी व जाणारी वाहतूक खोळंबली. एमआयटी महाविद्यालय ते इटखेडा तसेच मुख्य रेल्वेस्थानक ते इटखेडा दरम्यान वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या. परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com