थॅलेसिमिया, हिमोफिलीया रुग्णांसाठी रक्त केले उपलब्ध, कुठे ते वाचा...

thalsemia
thalsemia

परभणी ः लॉकडाउन व संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील थॅलेसिमिया व हिमोफिलीया या आजाराने ग्रस्त असणाऱ्या बालकांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने तातडीने पावले उचलून काळातही या रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना रक्त उपलब्ध करून दिले आहे.

जिल्ह्यातील १०७ बालक थॅलेसिमिया मेजर आजाराने ग्रस्त बालकांना महिन्यात दोनदा रक्त संक्रमण केले. तरच जिवंत राहू शकतात. सध्याच्या काळात ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी रक्तसंक्रमन करण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आहे त्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात रक्त उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  

गंगाखेड, सेलू व ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे सुविधा 
या अडचणी लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड, सेलू व ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे थॅलेसिमिया रुग्णालयात या बालकांची रक्तसंक्रमनाकरिता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे परभणी थॅलेसिमिया सपोर्ट ग्रुपचे लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी सांगितले. 

रुग्णांचे बाहेरगावी जाणे वाचले 

जिंतूर ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत दहा बालकांचे रक्तसंक्रमन करण्यात आले. मराठवाड्यात जानेवारीपासून ते आजपर्यंत जवळपास ५० रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात फॅक्टर आठ हे इंजेक्शन देण्यात आले. यापूर्वी या रुग्णांना पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथे जावे लागत होते. या काळातही ही सुविधा परभणीत उपलब्ध झाल्यामुळे या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.


थॅलेसिमिया ग्रुपचीही होते मदत
सध्याचा लॉकडाउनचा कालावधी वगळता एरव्हीपरभणी शहरात कार्यरत असणाऱ्या थॅलेसिमिया ग्रुपच्या सदस्यांकडून वेळोवेळी जिल्हा रुग्णालयातील ब्लड बॅंकेत आवश्‍यक असेल तेव्हा रक्त पुरवठा केला जातो. हे सदस्य या रुग्णांसाठी नेहमीच धावून येतात. शिवाय सध्या अनेक सामाजिक संस्था विविध उपक्रम राबविण्यापेक्षा रक्तदानाचे शिबिर घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विविध शिबिरातून मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन होत आहे.  

अशी आहे आकडेवारी 
- जिल्ह्यातील १०७ बालकांचे या महिन्यांत झाले दोनदा रक्तसंक्रमण
- जिंतूर रुग्णालयात दहा बालकांचे रक्तसंक्रमण
- जिल्हा रुग्णालयाकडून ५० जणांना फॅक्टर आठचे इंजेक्शन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com