गोदावरी नदीत नौका उलटली

कमलेश जाब्रस 
सोमवार, 11 जून 2018

माजलगांव : तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथील गोदावरी नदीमध्ये 35 भाविकांना नेणारी नौका उलटल्याने भाविक पाण्यात बुडाले परंतु पोलिस कर्मचा-यांनी व ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत या सर्व भाविकांना 
वाचविण्यात आले.

माजलगांव : तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथील गोदावरी नदीमध्ये 35 भाविकांना नेणारी नौका उलटल्याने भाविक पाण्यात बुडाले परंतु पोलिस कर्मचा-यांनी व ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत या सर्व भाविकांना 
वाचविण्यात आले.
    तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे देशातील एकमेव पुरूषोत्तम भगवान देवाचे हेमाडपंथी मंदिर आहे. सध्या धोंड्याचा महिणा सुरू असल्याने याठिकाणी मोठी यात्रा भरलेली आहे तर या अधिकमासाच्या महिण्यात भगवान पुरूषोत्तमाच्या दर्शनासाठी विवीध राज्यातुन भाविक येत आहेत. गोळेगाव (ता. घनसांगवी) येथे पुल नसल्याने पुरूषोत्तमपुरी  येथे येण्यासाठी होडी, कलई, नौका, चप्पुचा वापर केला जातो. आज ता. 11 सोमवारी गोळेगाव येथुन 35 भाविकांना पुरूषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी घेउन येणारी नौका अचानक पलटी झाल्याने सर्व भाविक पाण्यात पडले. परंतु बंदोबस्तावर असलेले पोलिस श्री. मोरे, प्रकाश ढोके, सचिन लोखंडे, विकास लोखंडे यांचे गावातील ग्रामस्थांनी या भाविकांना पाण्यातुन सुखरूप बाहेर काढत पुरूषोत्तमपुरी येथील खाजगी रूग्णालयात प्राथमिक उपचार केले असुन सर्व भाविकांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. 

Web Title: the boat drowoning in godavari river