पती-पत्नीचे मृतदेह आढळले; खुन करुन आत्महत्येचा संशय

रामदास साबळे
शुक्रवार, 23 मार्च 2018

पतीने अगोदर पत्नीची गळा दाबून हत्या केली व नंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

केज - तालुक्यातील तांबवा शिवारात पती-पत्नीचे मृतदेह गुरुवारी (ता. 22) रात्री उशिरा आढळून आले. यात पतीने अगोदर पत्नीची गळा दाबून हत्या केली व नंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. ललिता व सुंदर बळीराम मुंडे व असे या दाम्पत्याचे नाव आहे. 

केज तालुक्यातील नागझरी येथील मुळ रहिवासी असलेले सुंदर बळीराम मुंडे (वय 43) यांचा तांबवा येथील कुंडलिक चाटे यांची मुलगी ललिता हीच्याशी विवाह झाला. मागील कांही वर्षांपासून सुंदर बळीराम मुंडे हा आपल्या सासरवाडीतच कुटूंबासह वास्तव्यास होता. याच ठिकाणी शेतीही खरेदी केली होती. दरम्यान, नित्याप्रमाणे ललिता व सुंदर मुंडे (वय 37) हे गुरूवारी सकाळी तांबवा येथील शिवारातील स्वत:च्या शेतात काम करण्यासाठी गेले. हे दोघे पती-पत्नी रात्रीचा उशीर झाला तरीही घरी आले कसे आले नाहीत. या काळजीने गावातील नातेवाईक शेतात गेले असता ललिताचा मृतदेह आढळून आला. आसपासच्या शोध घेतला असता सुंदरचाही मृतदेह झाडास लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सुंदर याने अगोदर ललिताचा गळा आवळून खुन केला व नंतर स्वत: आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या दाम्पत्याला दोन मुले व एक विवाहित मुलगी आहे. 
 

Web Title: The bodies of husband and wife were found