डाव्या कालव्यात वृध्द महिलेचा मृतदेह अाढळला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

बोरगाव (जहांगिर) शिवारातील लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या डाव्या कालव्यात जंगली प्राण्यांनी लचके तोडलेल्या अवस्थेत मृतदेह अाढळून अाला.

सेलू - खादगाव (भाबट) ता. सेलू येथील रहिवाशी असलेल्या एका वृध्द महिलेचा मृतदेह बुधवारी (ता. 18) रोजी सकाळी सातच्या सुमारास बोरगाव (जहांगिर) शिवारातील लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या डाव्या कालव्यात जंगली प्राण्यांनी लचके तोडलेल्या अवस्थेत मृतदेह अाढळून अाला. दरम्यान या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले अाहे. अाकस्मित मृत्युची नोंद सेलू पोलिस ठाण्यात झाली अाहे. 

खादगाव (भाबट) ता. सेलू येथील रहिवाशी असलेल्या इंद्राबाई नामदेव गायकवाड (वय 60) या सोमवारी (ता. 16) रोजी बोरगाव (जहांगिर) येथील नातेवाईकांकडून माहेर असलेल्या कुपटा (ता. सेलू) येथे जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. बुधवारी (ता. 18) रोजी सकाळी सातच्या सुमारास बोरगाव (जहांगिर) शिवारातील लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या डाव्या कालव्यात जंगली प्राण्यांने लचके तोडलेल्या अावस्थेत त्यांचा मृतदेह एका शेतकर्‍याला दिसला. या घटनेची माहिती सेलू पोलिसांना दिल्यानंतर सेलू पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The body of an old woman was found in the canal