जालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

जालना - गोलापांगरी (ता. जालना) येथे विशेष कृती दलाने मंगळवारी शंभर रुपयांच्या तब्बल सहा लाख 17 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी संशयित आरोपी शेख समीर शेख मुन्ना (वय 23, रा. अंबड) यास अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अंबड येथून जालना शहरात बनावट नोटा येणार असल्याची माहिती विशेष कृती दलाचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांना सोमवारी मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकासह सापळा रचला. गोलापांगरी येथे आज मोटार अडवून झडती घेतली असता, सहा लाख 17 हजारांच्या बनावट नोटा आढळून आल्या. या प्रकरणात आणखी एका संशयिताचे नाव पुढे आले असून, लवकरच त्यालाही ताब्यात घेतले जाईल, असे पोकळे यांनी सांगितले.

Web Title: bogus currency seized crime