बनावट खत कारखान्याचा पर्दाफाश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

परभणी - शहरापासून दोन किलोमीटरवर बलसा परिसरात सुरू असलेली बनावट कृषी औषधे (कीटकनाशके), खत कारखान्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी पर्दाफाश केला. बनावट कीटकनाशके, खतांचा मोठ्या प्रमाणातील साठा जप्त करून हा कारखाना उद्‌ध्वस्त करण्यात आला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. बलसा परिसरात शेरे यांच्या जागेत गुरुकृपा मोटर्स या नावाने गेल्या अनेक दिवसांपासून शेतीसाठी लागणारी बनावट रासायनिक औषधे, खताची निर्मिती केली जात होती.

पोलिस अधीक्षक दिलीप झळके यांना यासंदर्भात माहिती मिळाली होती. त्याची शहानिशा करून त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. कारखान्यात वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने हुबेहूब लेबल तयार करून पॅकिंग केले जात होते. सुमारे 22 कंपन्यांच्या नावाने ही औषधे तयार केली जात होती.

Web Title: bogus fertilizer factory crime