जुन्या बाटलीत बनावट दारू!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

औरंगाबाद - जुन्या बाटल्यांमध्ये बनावट दारू भरून विक्री केली जात असल्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या छाप्यातून उघड झाला आहे. पथकाने बुधवारी (ता. चार) सायंकाळी तलवाडा शिवार (ता. सिल्लोड) येथे ही कारवाई केली. 

तलवाडा शिवारातील पाबळ तलावाजवळील एका शेतात पत्र्याच्या शेडमध्ये देशी व विविध कंपन्यांची बनावट देशी आणि विदेशी दारूनिर्मिती केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. यानंतर चार जुलैला भरारी पथकाने कारखान्यावर छापा मारला. पथकाने योगेश एकनाथ कावले व पंढरीनाथ एकनाथ कावले (रा. तलवाडा) यांना ताब्यात घेतले आहे.

घटनास्थळी बनावट देशी दारूच्या बाटल्या, बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या, विविध दारू कंपन्यांचे नाव असलेले सीलबंद करण्याचे मशीन, झाकण, तब्बल चार हजार रिकाम्या बाटल्या, हजार पॉलिकॅप, देशी दारूचे साडेचारशे रिकामे बॉक्‍स असे साहित्य पथकाने जप्त केले. कारखान्याचा मालक राजेंद्र तोताराम सावळे व गोपाळ रामदास दौंगे (दोघही रा. तलवाडा) पसार झाले आहेत.

ही कारवाई उपायुक्त संगीता दरेकर, अधीक्षक प्रदीप वाळुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आनंद कांबळे, दुय्यम निरीक्षक बी. के. चाळणेवार, पी. बी. ठाकूर, जवान व्ही. बी. मकरंद, आर. एम. भारती, एच. यू. स्वामी, सचिन पवार यांनी केली.

हॉटेल, ढाब्यांवर विक्रीचा संशय
या कारखान्यात तयार झालेली बनावट दारू महामार्गावरील हॉटेल व ढाब्यांवर विक्री होत असल्याचा संशय पथकाला आहे. रिकाम्या झालेल्या दारूच्या बाटल्या गोळा करून त्यात पुन्हा बनावट दारू भरली जात असल्याचा संशय पथकाला आहे. पांढऱ्या रंगाचे स्पिरीट व रंग; तसेच सुगंध यावा म्हणून विविध कंपन्यांची रसायने दारूत मिसळली जात होती.

बॉक्‍समागे दोनशे रुपये 
बनावट दारूच्या कारखान्यात योगेश व पंढरीनाथ कावले कामाला होते. बाटलीत दारू भरून एक बॉक्‍स सीलबंद करण्यासाठी त्यांना दोनशे रुपये दिले जात होते. कच्च्या मालाचीही मालकाने व्यवस्था लावली होती.

सिल्लोड परिसरातील बनावट विदेशी दारूनिर्मिती कारखान्यावर छापा
फ्लेवर्स, रंग वापरून दारूला चढवला सुगंध 
कारखान्याचे मालक पसार

Web Title: Bogus Liquor Crime