कारागृह पोलिस भरती परीक्षेत बोगस परीक्षार्थी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

औरंगाबाद - कारागृह पोलिस भरतीप्रक्रियेदरम्यान झालेल्या लेखी परीक्षेत मूळ उमेदवाराच्या जागी बनावट उमेदवार बसवून तोतयेगिरी केल्याचा प्रकार उघड झाला. व्हिडिओ शूटिंग तपासणीदरम्यान हा प्रकार उघड झाला. यात दोन संशयित परीक्षार्थींविरुद्ध गुरुवारी (ता. 22) क्रांती चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली. यात एकाला रात्री अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

चरणसिंग धनसिंग बहुरे (रा. हिरापूर, ता. औरंगाबाद) व देवसिंग जारवाल (रा. परसोडा, ता. वैजापूर) अशी तोतयेगिरी करणाऱ्या संशयित तरुणांची नावे आहेत. यात चरणसिंगला पोलिसांनी अटक केली. चार महिन्यांपूर्वी राज्यात पोलिस विभागाच्या पोलिस शिपाई, तुरुंगरक्षक पदांसाठी भरती प्रकिया झाली. यात औरंगाबादेतील हर्सूल कारागृहात भरतीसाठीच्या परीक्षेची जबाबदारी ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे होती. 14 ऑगस्ट 2016 ला शहरातील एका महाविद्यालयात लेखी परीक्षा घेण्यात आली. त्या वेळी कारागृह पोलिस भरतीसाठी चरणसिंग बहुरे या विद्यार्थ्याने अर्ज सादर केला होता. अर्ज केलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झाल्यावर त्यांची मैदानी चाचणी घेण्यात आली. यात चरणसिंग याने चांगलेच मैदान गाजवले. लेखी परीक्षेसाठी निवड झाली; पण पास होऊ का याबाबत शाश्‍वती नसल्याने तो डळमळला. यातून त्याने त्याला लेखी परीक्षेसाठी चरणसिंग बहुरेने त्याच्याजागी देवसिंग जारवालला बसवले. त्यावेळी हा प्रकार परीक्षकाच्या लक्षात आला नाही; पण त्या वेळी झालेले छायाचित्रण कारागृह प्रशासनाने तपासले. यात मैदानी चाचणीसाठी व परीक्षेला बसलेल्या दोन वेगळ्या व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तपासणी करणाऱ्यांनी ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातली. प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर तुरुंग अधिकारी भीमराव नारायण राऊत यांनी तक्रार दिली. त्यानुसार, दोघा परीक्षार्थींविरुद्ध फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली. याप्रकरणाचा तपास उपनिरीक्षक डी. बी. कोपनार यांनी केला.

Web Title: bogus student in jail police recruitment