GOOD NEWS : भोकरदनचे जुई धरण ओव्हरफ्लो : शहरासह पंचवीस गावांचा पाणीप्रश्न मिटला

दीपक सोळंके 
Saturday, 27 June 2020

भोकरदन शहरासह परिसरातील पंचवीस गावांना पाणी पुरवठा करणारा दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्प शुक्रवारी (ता.२६) मध्यरात्रीनंतर शंभर टक्के भरून ओहरफ्लो झाला आहे. परिणामी शहरासह पंचवीस गावांचा पाणीप्रश्न वर्षभरासाठी मिटला आहे.

भोकरदन (जि.जालना) : गेल्या सहा वर्षांपासून सतत दुष्काळचक्रात अडकलेल्या तालुक्यावर यंदा वरुणराजाने सुरुवातीपासून कृपादृष्टी दाखविली आहे. त्यामुळे भोकरदन शहरासह परिसरातील पंचवीस गावांना पाणी पुरवठा करणारा दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्प शुक्रवारी (ता.२६) मध्यरात्रीनंतर शंभर टक्के भरून ओहरफ्लो झाला आहे. परिणामी शहरासह पंचवीस गावांचा पाणीप्रश्न वर्षभरासाठी मिटला आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

गेल्या पाच वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे हिवाळ्यातच जुई धरण कोरडेठाक पडत होते. त्यामुळे शहराला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. गतवर्षी परतीच्या अवकाळी पावसाने धरण ओहरफ्लो झाले होते. यंदा मात्र, जून महिन्यातच धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे भोकरदन शहरासह दानापूर, दहेड, सुरंगळी, सुरंगळी वाडी, मूर्तड, वाडी, कठोरा बाजार, वाकडी, कुकडी, करजगाव, कल्याणी, सिपोरा बाजार, रेलगाव, बाभूळगाव, विरेगाव, भायडी, तळणी, पिंपळगाव रेणूकाई, रामेश्वर कारखाना, दगडवाडी आदी गावांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

७०० हेक्टर जमीन ओलिताखाली..
जुई मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने धरण परिसरातील जवळपास हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. पाणीसाठ्यामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे  धरणातील एकूण ६.०३ द.ल.घ.मी. पाण्यासाठी पैकी २.६ द.ल.घ.मी. पाणी साठा हा पिण्यासाठी तर उर्वरित साठा हा सिंचनासाठी राखीव असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले. 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

 सांडव्यावरुन वाहतय नितळ पाणी..
धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणाच्या सांडव्यावरुन ५ सेंटीमीटर वाहणारे नितळशार पाणी एखाद्या धबधब्यासारखे भिंतीवरून खाली कोसळत आहे. हा मनमोहक नजरा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांचे पावले धरणाच्या दिशेने वळत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bokardan Jui dam overflow