बोल्‍डावाडी ठरतेय रोलमॉडेल

boldawadi
boldawadi

हिंगोली : बोल्‍डावाडी (ता. कळमनुरी) येथे केंद्र शासनाच्या ग्लोबल व्हिलेजअंतर्गत १०२ घरकुलांचे बांधकाम झाले आहे. गावात शासनाची अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. गावकऱ्यांच्या एकजुटीने गावाने आतापर्यंत शासनाच्या विविध योजनांत सहभाग घेऊन प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. त्यामुळे हे गाव जिल्‍ह्यासाठी एक रोल मॉडेल ठरले आहे.

कळमनुरी तालुक्‍यातील बोल्‍डावाडी हे आदिवासीबहुल गाव असून लोकसंख्या एक हजार आहे. गावात १४८ कुटुंब आहेत. हिंगोली जिल्‍ह्याच्या निर्मितीनंतर जिल्‍ह्यात राबविण्यात आलेल्या सगळ्याच योजनेत गावाने सहभाग घेतला आहे. यात निर्मल ग्राम योजना, विहीर पुनःभरण, स्‍वच्‍छता अभियान, पाणंदमुक्‍ती आदी योजनांचा समावेश आहे. या योजनेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. तसेच विहीर फेरभरण योजना राबविल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामध्येही गावाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. 

१४८ कुटुंबांकडे स्‍वच्‍छतागृह

केंद्र शासनाच्या इकोटेक व्हिलेज प्रकल्‍पांतर्गत गावाची निवड होऊन १०२ घरकुलांची बांधकामे करण्यात आली. तसेच सौरऊर्जेवरील कूकर, स्‍नानगृह, स्‍वच्‍छतागृह, नवीन नळ योजना, बाजारासाठी जागा, नव्याने शाळेसाठी इमारत, उद्यान आदींचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच अंतर्गत रस्‍ते, रस्‍त्‍याच्या दुतर्फा झाडे, नाली बांधकाम, पिण्याच्या पाण्यासाठी शुद्धीकरण केंद्र, घनकचरा व्यवस्‍थापन, गोबरगॅस प्रकल्‍प, सौरऊर्जेवरील पथदिवे, पाण्याचे संवर्धन, कृषी विकास केंद्र, समाज मंदिर आदींमुळे गाव हायटेक झाले आहे. गावातील १४८ कुटुंबांकडे स्‍वच्‍छतागृह आहेत. गावाच्या एकजुटीने हे गाव ग्लोबल व्हिलेज झाले आहे.

इतर गावांनी आदर्श घेण्याचे आवाहन

ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. मात्र, अनेक जण या योजना नाममात्र राबवितात. त्यामुळे गावाचा विकास झालेला पहावयास मिळत नाही. मात्र, बोल्डावाडी गावाने शासनाच्या बहुतांश योजना गावात प्रभाविपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावाचा विकास होण्यास मदत झाली आहे. बोल्डावाडी गावाचा इतर गावानेही आदर्श घेतल्यास गावांचा विकास होईल.

गावऱ्यांच्या बैठकीत निर्णय

आतापर्यंत गावात शासनाच्या विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. विकास योजना राबविण्यासाठी गावऱ्यांची बैठक घेऊन त्‍यावर विचार विनिमय केला जातो. सर्वांच्या कल्‍पनेतून कामे साकारली जातात. यासाठी कर्मचारी मार्गदर्शन करतात.
-शिवराम कऱ्हाळे, माजी सरपंच 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com