परंड्यातील किल्ल्यात आढळला बॉंब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

परंडा - शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात मजुरांमार्फत खोदकाम करताना एका दगडाखाली 36 हॅंड ग्रॅनाईट (हातबॉंब) आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी (ता. 25) दुपारी पावणेपाचच्या सुमारास हा बॉंब आढळून आला. याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी केली.

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात पुरातन विभागाच्या वतीने राज्य संरक्षित स्मारकाअंतर्गत मिळालेल्या निधीतून कामे सुरू आहेत.

15 दिवसांपासून येथे सुमारे 50 मजुरांमार्फत झाडेझुडपे काढणे व खोदकाम सुरू आहे. किल्ल्याच्या आतील बाजूस पुरातन शिवमंदिर आहे. या शिवमंदिराच्या पाठीमागील बाजूस 1996-97 मध्ये उत्खनन करून लहान-मोठे दगड रचून ठेवण्यात आले होते. हे दगड काढून अंथरण्याचे काम मजूर करीत होते. दरम्यान, बुधवारी दुपारी पावणेपाचच्या सुमारास खोदकाम करताना मजुराला हा 36 हॅंड ग्रॅनाईट बॉंब दिसला. किल्ला चौकीदार ज्ञानेश्वर गावडे यांनी पोलिस व वरिष्ठ विभागाशी संपर्क करून माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक डॉ. विशाल शहाणे हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पाहणीत हा 36 हॅंड ग्रॅनाईट बॉंब असल्याचे निदर्शनास आले.

या बॉंबची पीन काढून आतील स्प्रिंग एकावर एक आदळल्यास मोठा स्फोट होऊ शकतो. साधारण 100 मीटरपर्यंत नुकसान होऊ शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. हा बॉंब निकामी करण्यासाठी बॉंबशोधक, नाशक पथकाशी व जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी संपर्क करण्यात आल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. धुमाळ यांनी सांगितले. बॉंब सापडलेल्या ठिकाणी मार्किंग करून तेथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांना किल्ल्यात प्रवेश देताना मज्जाव करण्यात येत आहे.

Web Title: bombs found in paranda

टॅग्स