सुखरूप जन्मले पावणेपाच किलोचे बाळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - डॉक्टरांचे प्रयत्न आणि मातेची मिळालेली साथ यामुळे तब्बल पावणेपाच किलो वजनाच्या बाळाचा नैसर्गिक प्रसूतीद्वारे जन्म झाला. शिवाजीनगर भागातील खासगी रुग्णालयात मंगळवारी (ता. १३) ही प्रसूती झाली. माता व बाळाची प्रकृती उत्तम असली, तरी त्यांना ४८ तास निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे.

डॉ. घनश्‍याम मगर यांनी सांगितले, की प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होतानाच बाळाचे वजन जास्त असल्याची कल्पना आम्हाला आली. आई-वडील व नातेवाइकांशी चर्चा केल्यानंतर नैसर्गिक प्रसूती करण्याचा निर्णय घेतला.

गरज भासल्यास ‘सिझेरियन’ करावे लागू शकते, याचीही कल्पना त्यांना देण्यात आली होती. यापूर्वीही नैसर्गिक बाळंतपण झाल्यामुळे डॉक्‍टरांच्या टीमने मातेला नैसर्गिक प्रसूतीसाठी प्रोत्साहन दिले. मातेनेही योग्य साथ दिल्यामुळे या ‘वजनदार’ बाळाचा नैसर्गिकरीत्या जन्म झाला. गरोदरपणात वाढलेले मातेच्या रक्तातील साखरेचे प्रमाण हे मुख्यतः बाळाच्या वजनवाढीस कारणीभूत असते. अशी बाळे एक टक्‍क्‍यापेक्षा कमी असतात. मातेची शरीरयष्टी, स्थूलता आणि गरोदरपणात मातेचे वाढलेले वजन अशी इतर कारणेही असू शकतात, असे डॉ. मगर म्हणाले. चार किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या बाळाच्या वजनाचे सोनोग्राफीत अचूक निदान करणे अवघड आहे. प्रसूतीदरम्यान बाळाचे खांदे अडकण्याची शक्‍यता असते. प्रसूतीनंतर ४८ तासांपर्यंत बाळाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे गरजेचे असते. बाळाची व आईची तब्येत ठणठणीत असल्याचेही डॉ. घनःश्‍याम मगर यांनी सांगितले.

Web Title: Born baby Doctor Mother