अर्भकाच्या मोफत आधार कार्ड नोंदणी उपक्रमाचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

उस्मानाबाद - नवजात अर्भकाच्या मोफत आधार कार्ड नोंदणी उपक्रमाचे उद्‌घाटन पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते गुरुवारी (ता.२२) करण्यात आले. राज्यातील हा पहिला अभिनव उपक्रम असून, येथील स्त्री रुग्णालयात जन्मलेल्या नवजात अर्भकाचे आधार कार्ड नोंदणी करण्यात आली.

पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते नवजात बालकाची आधार कार्ड नोंदणी करून कार्ड बालकाच्या आईला देऊन या उपक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माले म्हणाले, की उस्मानाबाद जिल्ह्यात या उपक्रमाची सुरवात २३ सप्टेंबरपासून करण्यात आली आहे. रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी प्रसूत माता व त्यांच्या नातेवाईकांना जन्मत: आधार कार्ड नोंदणी करण्याबाबत समुपदेशन करीत आहेत. प्रसूत मातांची आधार कार्ड नोंदणी झाली नसल्यास त्यांनाही आधार कार्ड नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

रुग्णालयात लसीकरणासाठी आलेल्या बालकांचीही आधार कार्ड नोंदणी केली जात आहे. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. २३ सप्टेंबरपासून आतापर्यंत ५९७ जन्मत: आधार कार्ड नोंदणी झालेली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे, परिविक्षाधिन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी के. बी. कोंडेकर, सहायक जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पी. एन. रुकमे, अमित चापले, लक्ष्मण कांबळे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Web Title: born baby free aadhar card registration