पतीच्या निवृत्तिवेतनावर दोन्ही पत्नींचा अधिकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - पतीच्या निवृत्तिवेतनावर दोन्ही पत्नींचा समान अधिकार असल्याचा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिला. दोनही पत्नी जिवंत असेपर्यंत त्यांना निवृत्तिवेतनाचे समान वाटप करून द्यावे, तसेच भविष्यात जी पत्नी जिवंत असेल तिचा निवृत्तिवेतनावर पूर्ण अधिकार असेल, असे न्या. जे. डी. कुलकर्णी यांनी शनिवारी (ता. चार) एका निकालात स्पष्ट केले.

उदगीर (जि. लातूर) येथील किशनराव कुलकर्णी हे कृषी खात्यात सह कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचा पहिला विवाह राधाबाई यांच्याशी झाला. पहिल्या पत्नीच्या संमतीने त्यांनी आशाबाईशी दुसरा विवाह केला. दरम्यान, 1985 मध्ये कुलकर्णी यांचे निधन झाले. त्यांचे निवृत्तिवेतन पहिली पत्नी राधाबाई व दुसऱ्या पत्नीच्या मुलीला समप्रमाणात वाटून मिळत होते. 2007 मध्ये मुलीचा विवाह झाल्यानंतर संपूर्ण निवृत्तिवेतनाची रक्कम पहिल्या पत्नीला देण्याचा निर्णय महालेखाधिकाऱ्यांनी घेतला.
दरम्यान, दुसरी पत्नी आशाबाई यांनीही महालेखाधिकाऱ्यांकडे निवृत्तिवेतनासाठी अर्ज दाखल केला; मात्र हिंदू-विवाह कायद्यानुसार पहिली पत्नी जिवंत असताना केलेला विवाह हा वैध नसल्याने आशाबाईंचा दावा फेटाळण्यात आला. त्याविरोधात त्यांनी ऍड. शिवकुमार मठपती यांच्यामार्फत मॅटमध्ये धाव घेतली होती.

Web Title: both wifes will be same right on pension of husbund