विद्यापिठाची फसवणूक करणारा भामटा गजाआड 

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 25 एप्रिल 2018

नांदेड : स्वामी रामनंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठाची बीपीएडची पदवी मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या एका विद्यार्थ्यावर मंगळवारी (ता. २४) गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

नांदेड : स्वामी रामनंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठाची बीपीएडची पदवी मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या एका विद्यार्थ्यावर मंगळवारी (ता. २४) गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

तेलंगणातील निझामबाद जिल्ह्यातील कामारेड्डीमधील नागापूर येथे राहणारा ए. अरविंदकुमार धर्मपुरी यानी कौठा नांदेड येथील सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे बनावट व खोटे बोनाफाईड प्रमाणपत्र तयार केले. एवढेच नाही तर चक्क त्याने स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठातून मायग्रेशन, पासींग आणि गुणपत्रक बनावट तयार केले. ही सर्व प्रमाणपत्रे खरी आहेत असे दाखवून त्याने बीपीएडच्या पदवीसाठी परिक्षा नियंत्रक यांच्या कार्यालयात अर्ज केला.

परिक्षा नियंत्र डॉ. रवी सरोदे यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी ए. अरविंदकुमार याने दाखल केलेले सर्व कागदपत्राची शहानिशा केली. कौठा येथील शाळेत विचारपूस करून विदापिठातही त्या कागदपत्राची पडताळणी केली. मात्र दोन्ही ठिकाणी अशा पध्दतीचे प्रमाणपत्र कुणालाही देण्यात आले नव्हते. विद्यापीठ व सरस्वती शिक्षण मंडळाची फसवणूक होत असल्याचे समजले. या प्रकरणी डॉ. रवी सरोदे यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक श्री. पवार यांनी आरोपी ए. अरविंदकुमार याला अटक केली आहे. 

Web Title: boy cheated on university arrested