बीड जिल्ह्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 March 2020

पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ( ता.२० ) तालुक्यातील तिंतरवणी येथे घडली. राहूल विष्णूपंत नागरगोजे (वय २३) असे या तरुणाचे नाव आहे.

शिरूर कासार, (जि.बीड) : पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ( ता.२० ) तालुक्यातील तिंतरवणी येथे घडली. राहूल विष्णूपंत नागरगोजे (वय २३) असे या तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा- मार्चमध्ये बँका राहणार आठ दिवस बंद, वाचा कोणते...

राहुल नागरगोजे शुक्रवारी मित्रासोबत पोहण्यासाठी तलावावर गेला. पोहत असताना त्याला तलावातील पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो पाण्यात मध्यापर्यंत गेला. तो पाण्यात बुडत असताना मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात यश आले नाही. सुनिल नागरगोजे यांच्या खबरीवरुन चकलंबा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दोन पोलिस निरीक्षक, दहा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
जालना ः दरोड्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केलेल्या प्रकरणी जालना येथील दोन पोलिस निरीक्षक व दहा पोलिस कर्मचार्यांचे विषेश पोलिस महानिरीक्षक डाॅ. रवींद्रकुमार सिंघल यांनी शुक्रवारी (ता.20) रात्री उशिरा निलंबानाचे आदेश दिले आहेत.
शहरातील कदीम जालना पोलिस ठाण्यात तत्कालीन एडीएसच्या पथकाकडून आपल्यावर ता. चार जानेवारी रोजी दरोड्याचा खोटा गुन्हात दाखल करून अडकविण्यात आल्याची तक्रार अनिल गोरखनाथ ओलेकर (वलेकर) याने विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या आदेशाने ता.26 फेब्रुवारी रोजी पैठण-फुलंब्रीचे उपविभागीय पोलिस अधीकारी गोरख भांबरे यांचे पथक चौकशीकामी जालना येथे आले होते.

क्लिक करा- मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच

या पथकाने दोन पोलिस निरीक्षक, व पोलिस कर्मचार्यांची चौकशी केली होती. तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय, कदीम जालना पोलिस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली होती. या चौकशीनंतर दरोड्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात विशेष पोलिस महानिरीक्षक डाॅ. रवींद्रकुमार सिंघल यांनी तत्कालीन एडीएसचे पथक प्रमुख पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांच्यासह दहा पोलिस कर्मचार्यांना निलंबीत केले आहे. या प्रकरणी या दोन पोलिस निरीक्षकांसह  दहा पोलिस कर्मचार्यांची खात्याअंतर्गत चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण होईपर्यंत हे निलंब करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षत चैतन्य एस यांनी सांगितले आहे.

Boy Death while Swimming in pond Beed News


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boy Death while Swimming in pond Beed News