भोकरदन : आईला वाचविताना मुलाचा शॉक लागून मृत्यू

son.jpg
son.jpg

भोकरदन (जालना) : लोखंडी गेटमध्ये उतरलेल्या वीज प्रवाहामुळे गेटला चिकटलेल्या आईला वाचविताना 24 वर्षीय तरुण मुलाचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथे सोमवारी (ता.19) सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. जगन बबन राऊत असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

दरम्यान, जगन राऊत हा तरुण सोयगाव देवी शिवारातील त्यांच्या स्वतःच्या शेतात आई, पत्नीसह राहतो. सोमवारी (ता. 19) सकाळी नेहमीप्रमाणे घरची कामे सुरू होते. यावेळी जगन राऊत यांची आई अलकाबाई राऊत घरासमोरील लोखंडी गेट उघडून बाहेर जात असतांना गेटमध्ये अचानक उतरलेल्या वीज प्रवाहामुळे आई शॉक लागल्याने ती ओरडल्या. आईचा आवाज ऐकून जगन आईला वाचविण्यासाठी धावला. त्याने आईला ओढून बाजूला केले, मात्र तो स्वतः त्या गेटला चिकटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

सहा महिण्यापूर्वी झाले होते लग्न
जगन पोटात असतानाच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. आईने मोठ्या मेहनतीने त्याला मोठे केले होते. आईला एकलुत्या एक असलेल्या जगनचे मागील सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्याचाही असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याची आई व पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com