पबजी खेळता खेळता तो पडला बेशुद्ध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

शेवाळा(जि. हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे पबजी मोबाईल गेममुळे एक युवक बेशुद्ध झाल्‍याची घटना मंगळवारी (ता.पाच) घडली असून त्‍याला उपचारासाठी नांदेडच्‍या रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेवाळा(जि. हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे पबजी मोबाईल गेममुळे एक युवक बेशुद्ध झाल्‍याची घटना मंगळवारी (ता.पाच) घडली असून त्‍याला उपचारासाठी नांदेडच्‍या रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या तरुणांमध्ये पबजी गेम खेळण्याचे वेड लागले आहे. दिवसरात्र मोबाईलवर पबजी गेम खेळण्यामुळे त्‍याचा वाईट परिणाम होवू लागला आहे. मात्र त्‍यानंतरही तरुणांमध्ये अँड्रॉईड मोबाईलचे फॅड कमी होत नसल्‍याचे चित्र आहे. शेवाळा येथील नईफ खालेद बागवान हा तरूण मंगळवारी (ता. 5) सकाळपासून पबजी गेम खेळत होता. मोबाईलवर हा गेम खेळता खेळता त्‍याला चक्‍कर आली. हा प्रकार घरच्‍यांना लक्षात आल्‍यानंतर त्‍यांनी आरडाओरड केली. त्‍यामुळे परिसरातील इमरान बागवान, फारुख बागवान, शेख जुबेर, फयूम बागवान यांनी तातडीने धाव घेवून नईफ यास उपचारासाठी ग्रामीण रुग्‍णालयात दाखल केले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.व्‍ही. दुर्गे यांनी त्‍याच्‍यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले आहे. सध्या त्‍याच्‍या प्रकृतीत सुधारणा होत असल्‍याचे सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a boy fainted due to PUBG in Hingoli