हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून तरुणाचा खून

योगेश पायघन
शनिवार, 11 मे 2019

औरंगाबाद : भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमात सख्या चुलत भावांचा नाचण्यावरून वाद झाला. तो वाद विकोपाला गेल्याने एकाने दुसऱ्याच्या छातीत चाकू खुपसल्याने 20 वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता 10) साडे दहाच्या सुमारास चिकलठाण्यातील ऋषीकेश नगर येथे घडली. आकाश मारोती शेळके (रा मुकुंदवाडी, संजय नगर गल्ली नंबर 16) असे मृताचे नाव आहे. तर घटनेनंतर आरोपी पसार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून सचिन दशरथ शेळके आणि त्याचा चुलत भाऊ आकाश मारोती शेळके यांच्यात वाद होता. आकाश सेन्ट्रीग काम करतो तर सचिन सिडकोतील महाविद्यालयात शिकत आहे.

या दोघांच्या भाचीच्या हळदीचा कार्यक्रम शुक्रवारी चिकलठाण्यातील ऋषीकेश नगर येथे सुरू होता. त्यात दोघांचा नाचण्यावरून पुन्हा वाद झाला. वाद वाढल्याने सचिन शेळकेने आकाशच्या छातीत शुक्रवारी साडे दहाच्या सुमारास चाकू खुपसला. जखमी आकाशला नातेवाईकांनी खाजगी  रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. दरम्यान आरोपी फरार झाला. या घटनेची नोंद एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली. प्रकरणाचा तपास प्रकाश घुगरे करित आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy s murder at Haldi ceremony due to quarrel at Aurangabad