वसमत शहरात धाडसी घरफोडी, सोन्याच्या दागिण्यांसह साडेचार लाखाचा ऐवज लंपास 

संजय बर्दापुरे  
Tuesday, 26 January 2021

अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. २६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडसी चोरीने शहर व परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : वसमत येथील श्रीनगर कॉलनी भागातील श्रीकांत नरहरी देसाई यांच्या बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम, सोन्याचे दागिण्यासह चार लाख ४७ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. २६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडसी चोरीने शहर व परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यवसाय तांत्रिक अधिकारी असलेले श्रीकांत देसाई राहणार श्रीनगर कॉलनी वसमत हे ( ता. २३) जानेवारी रोजी आपल्या मूळगावी चुडावा (तालुका पूर्णा) येथे धार्मिक कार्यक्रमानिमित्त सहकुटुंब गेले होते. दरम्यान सोमवारी ( ता. २५) जानेवारी रोजी रात्री ते परत आपल्या घरी आले असता चोरी झाल्याचे दिसून आले.

हेही वाचाशिवेंद्रसिंहराजेच नाही, तर अनेक नेते राष्ट्रवादीत येणार; शरद पवारांच्या विश्वासू नेत्याचा पक्का दावा

अज्ञात चोरट्यांनी घराचे दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन लाकडी कपाटाचे कुलूप तोडले व कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने सात तोळे अंदाजित किमंत दोन लाख ८० हजार व नगदी एक लाख ६७ हजार रुपये असा एकूण चार लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. दरम्यान मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास श्रीकांत देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक बोधनापोड करत आहेत. 

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brave burglary in Wasmat city, Rs 4.5 lakh looted along with gold jewelery hingoli news