लग्नासाठी जमलेल्या वऱ्हाडींवर आली वधुपित्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ..!

मुलीचे लग्न लागल्यानंतर पुढील धामधूम सुरू होती. यातच वधुपिता काही कामानिमित्त रस्ता ओलांडत पलीकडे जात असताना अचानक...
Jalna Accident News
Jalna Accident Newsesakal

भोकरदन (जि.जालना) : मुलीचे लग्न लागल्यानंतर पुढील धामधूम सुरू होती. यातच वधुपिता काही कामानिमित्त रस्ता ओलांडत पलीकडे जात असताना अचानक भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने वधुपित्याला जोराची धडक दिली. या धडकेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.14) रात्री साडेआठ वाजेदरम्यान भोकरदन-जाफ्राबाद मुख्य रस्त्यावरील विरेगाव येथे घडली. या घटनेमुळे लग्नासाठी जमलेल्या वऱ्हाडी मंडळींवर वधुपित्यावर अंत्यसंस्काराची वेळ आली. राजू शेषराव खंडागळे (वय ४८) असे या अपघातात मृत झालेल्या वधुपित्याचे नाव आहे. (Bride Father Died In Accident After Daughter Wedding In Bhokardan Of Jalan)

Jalna Accident News
जे सरकार सामान्य माणसांची दखल घेत नाही, ते जागेवर राहत नाही : फडणवीस

मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील विरेगाव येथील राजू खंडागळे यांच्या मुलीचा विवाह (Marriage) सोहळा मंगळवारी रात्री सुरू होता. लग्नामुळे परिवारात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाह सोहळा देखील पार पडला. लग्नानंतर वधुपिता राजू खंडागळे काही कामानिमित्त गावातील भोकरदन (Bhokardan) - जाफ्राबाद मुख्य रस्ता पायी ओलांडत असताना अचानक भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली व तेथून वाहनासह पळ काढला. याची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी तातडीने राजू खंडागळे यांना भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

Jalna Accident News
महाविकास आघाडी भाजपला रोखू शकत नाही, रावसाहेब दानवे यांचे खुले आव्हान

मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक सोन्नी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेने खंडागळे कुटुंबातील आनंदाचे वातावरण दुःखात बदलून गेले. ऐन मुलीच्या लग्नाच्या दिवशी वधुपित्यावर अंत्यसंस्काराची वेळ लग्नासाठी जमा झालेले वऱ्हाडींवर आली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून आज बुधवारी (ता.१५) सकाळी विरेगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी भोकरदन पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com