पुराने नदीवरील पुलच गेला वाहून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

उपळी, अंधारी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने उपळी ते भराडी रस्त्यावर असलेला पूल वाहून गेल्याने दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे. खचलेल्या पुलाचे काम लवकर करावे अशी मागणी नागरिक करत आहे.
 

सिल्लोड(औरंगाबाद)- उपळी, अंधारी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने उपळी ते भराडी रस्त्यावर असलेला पूल वाहून गेल्याने दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे. खचलेल्या पुलाचे काम लवकर करावे अशी मागणी नागरिक करत आहे.

शनिवारी (ता.23) रात्री 11 वाजेच्या दरम्यान नदीला अचानक आलेल्या मोठ्या पुरामुळे नदीकाठच्या लोकांना कुटुंबासह गुरांना घेऊन उंच ठिकाणी जावे लागले. अंजना नदीला पहिलाच मोठा पूर आला असून यापूर्वी, असा पूर कधीच पाहिला नाही, असे गावातील ज्येष्ठ नागरिक सांगत आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The bridge over the river was carried