जालन्यात पुलांच्या कठड्यांची होईना दुरुस्ती 

जालना ः नूतन वसाहत उड्डाण पुलाचा मागील अनेक वर्षांपासून पडलेला कठडा. 
जालना ः नूतन वसाहत उड्डाण पुलाचा मागील अनेक वर्षांपासून पडलेला कठडा. 

जालना - शहरातील पुलांचे कठडे मागील अनेक वर्षांपासून धोकादायक अवस्थेत आहेत. मात्र, याकडे नगरपालिका प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. परिणामी या धोकादायक पुलांना काटेरी फांद्या, पत्रांचा आधार देण्यात आल्याचे चित्र जालना शहरात पाहण्यास मिळत आहे. 

जालना शहरातील कुंडलिका-सीना नदीपात्रावर पाच पूल आहेत. तर नूतन वसाहत येथे उड्डाणपूल आहे. मागील काही महिन्यांपूर्वीच कुंडलिका नदीपात्रावरील इंग्रजकालीन लोखंडी पूल जमिनदोस्त करण्यात आला. शहरातील इतर पुलांच्या कठड्याची दुरावस्था झाली आहे.

नूतन वसाहत येथील उड्डाणपुलावर काही वर्षांपूर्वी सळईने भरलेला ट्रक उलटला होता. त्यामुळे या पुलावरील कठडा कोसळला. मात्र, मागील दोन ते अडीच वर्षांपासून नगरपालिकेने या पुलाचा साधा कठडाही दुरूस्त केलेला नाही. उलट याठिकाणी काटेरी फांद्या लावून वाहनाचालकांना धोक्याचा इशारा दिला जात आहे.

दुसरीकडे कुंडलिका नदीपात्रावरील लहान पुलाचे कठडेही धोकादायक झाले आहेत. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाकडून येथे चक्क पत्रे ठोकून वाहन चालकांना धोक्याचा इशारा दिला आहे आहे. मात्र, या पुलांचे कठडे दुरूस्तीकडे पालिका प्रशासन लक्ष देण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. 

शहरातील उड्डाणपुलांच्या कठड्यांची दुरूस्तीच्या कामासंदर्भात प्रक्रीय सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये या पुलांचे कठडे बसविण्यात येतील. तसेच इतर छोट्या पुलांची देखभाल दुरूस्तीही नगरपालिकेकडून केली जाईल. 
- नितीन नार्वेकर, मुख्याधिकारी, नगरपालिका, जालना. 

(संपादन : संजय कुलकर्णी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com