पैसे आण, तरच ये...

file photo
file photo

नांदेड : घर घेण्यासाठी माहेराहून तिन लाख रुपयाची मागणी करून एका विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करणाऱ्या सासरच्या मंडळीविरुध्द भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
 
शहराच्या सहयोगनगर भागात माहेर असलेल्या युवतीचे लग्न बिड जिल्ह्यातील राजेगाव (ता. माजलगाव) येथील धोंडीराम इबिते (३२) याच्यासोबत झाले होते. लग्नानंतर तिला सासरी काही दिवस चांगले नांदवले. त्यानंतर मात्र तिचा छळ करणे सुरू केले. हा प्रकार ता. १० मे २०१४ ते ता. २० आॅक्टोबर २०१९ या काळात तिचा छळ सुरूच ठेवला. घर घेण्यासाठी तिला माहेराहून तीन लाखाची मागणीकरून तिचा मानसिक व शरिरीक छळ केला. एवढेच नाही तर तुला मुल होत नाहीत, स्वयंपाक करता येत नाही, दिसायला चांगली नाहीस असे म्हणून त्रासून सोडले. 

सततच्या त्रासाला कंटाळून माहेर गाठले

या सततच्या त्रासाला कंटाळून पिडीत विवाहिता हिने आपले माहेर गाठले. यानंतरही तिचा छळ कमी झाला नाही. त्यानंतर तिच्या माहेरी येऊन पती व अन्य नातेवाईकांनी वाद घालून माहेरच्या मंडळीना धक्काबुक्की केली. एवढेच नाही तर ठार मारण्याची धमकी दिली. शेवटी या महिलेनी पोलिस अधिक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षात धाव घेऊन न्याय देण्याची विनंती केली. या कक्षाने तिच्या सासरच्या मंडळीना बोलावून त्याच्यातील वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र त्यांनी पिडीत महिलेस नांदविण्यास नकार दिला. शेवटी पिडीतेने महिला सहाय्य कक्षाचे पत्र घेऊन भाग्यनगर पोलिस ठाणे गाठले.

भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा 

पिडीतेच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिसांनी गणपतराव ईबिते, सरोजना ईबिते दोघे रा. राजेगाव (ता. माजलगाव, बीड), धोंडिराम ईबिते, रेष्मा ईबिते, लक्ष्मण ईबिते,  संगिता सर्व राहणार पूणे, सविता आणि निता (कर्नाटक राज्य) यांच्याविरुध्द विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार एम. आर. माळगे करीत आहेत. यातील एकही आरोपी अजून पोलिसांच्या तावडीत आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

वाद सोडविणे अंगलट...

नांदेड : गल्लीत येऊन बाहेरचे तरूण गल्लीतीन तरुणांना मारहाण करीत असल्याची माहिती मिळताच तो वाद सोडविण्यासाठी गेलेल्या जितेंद्र सुरनर यांचेच डोके फोडले. यात ते गंभीर जखमी झाले असून तिघांवर भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास श्रीनगर भागात घडली. 

श्रीनगरमध्ये शनिवारी (ता. ११) जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास रामराव पवार मार्ग गल्लीत अभिजीत मोहिते आणि गोविंद यादव हे गप्पा करीत बसले होते. यावेळी त्या ठिकाणी येऊन जुन्या वादातून मुखीद गॅसवाला, जिबु पिरासत आणि मजहरखान हे तिथे येऊन त्यांच्याशी वाद घालु लागले. हे याच भागात राहणारे जितेंद्र नागनाथराव सुरनर यांना समजताच ते तिथे वाद सोडविण्यासाठी गेले. यावेळी हल्लेखोरांनी त्यांनाच मारहाण करत त्यांचे डोके फोडले. यात त्यांना जबर दुखापत झाली. त्यांच्या डोक्याला दहा टाके पडले आहेत. एवढेच नाही तर त्यांना या तिघांनी लाथाबुक्यानी मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. जितेंद्र सुरनर यांनी उपचारानंतर भाग्यनगर पोलिस ठाण्यात जावून वरील तिघांविरुध्द तक्रार दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच याच प्रकरणात सय्यद मुखीद सय्यद नवा याच्या फिर्यादीवरुन जितेंद्र सुरनर, सिंधु आणि बाळा या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार एन. जे. शेख करीत आहेत. 
  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com