एकाचे बांबूच्या काठीने फोडले डोके

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

माझ्या मामाला शिवीगाळ का केली म्हणून बांबूच्या काठीने डोके फोडून गंभीर जखमी केल्याची घटना पैठण येथे एका मंगल कार्यालयात मंगळवारी (ता.आठ) घडली. याप्रकरणी पोलिसांनी केकत जळगाव (ता. पैठण) येथील सरपंच भीमराव नाना थोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पैठण (जि.औरंगाबाद) : माझ्या मामाला शिवीगाळ का केली म्हणून बांबूच्या काठीने डोके फोडून गंभीर जखमी केल्याची घटना पैठण येथे एका मंगल कार्यालयात मंगळवारी (ता.आठ) घडली. याप्रकरणी पोलिसांनी केकत जळगाव (ता. पैठण) येथील सरपंच भीमराव नाना थोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सावरगाव (जि. बीड) येथे मंगळवारी (ता.आठ) होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी जाण्याबाबत मंगल कार्यालयात दुपारी तीनला नियोजनासाठी बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत सरपंच भीमराव नाना थोरे यांनी प्रभाकर लक्ष्मण नागरे यांना तू माझ्या मामाला शिवीगाळ का केली म्हणून विचारणा करून वाद घातला व कार्यालयातील एका ठिकाणी असलेली बांबूची काठी घेऊन डोक्‍यात मारून रक्तबंबाळ केले. त्यानंतर हे भांडण बैठकीतील उपस्थित असलेल्या गोपीनाथ वाघ व सुरेश दराडे यांनी सोडविले व जखमी झालेल्या प्रभाकर नागरे यांना पैठण येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या मारहाणीत जखमींच्या डोक्‍यात सतरा टाके पडले. याबाबत देण्यात आलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रामकृष्ण सागडे हे करीत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Broken Head By Bamboo Stick